तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Saturday, 9 November 2019

पालम माहेश्वरी समाजाचे तालुका अध्यक्ष राजकुमार मुदंडा यांची निवड

अरुणा शर्मा


पालम :- येथील करवा हॉस्पीटल मध्ये माहेश्वरी समाजाची बैठक संपन्न झाली. यावेळी मागील कार्यकारणीचा आठावा घेण्यात आला व नविन कार्यकारणी घोषीत करण्यात आली. यावेळी माहेश्वरी संघटन मत्री भंडारी परभणी, काबरा बोरी यांची उपस्थिती होती. यावेळी पालम माहेश्वरी समाजाचे तालुका अध्यक्ष पदी राजकुमार मुदंडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर पुढील कार्यकारणी उपाध्यक्ष किशोर भूतडा, सचिव सुरेश भुतडा, कोषाध्यक्ष घनशाम भुतडा, संघटन मत्री अँड. रामजी मणियार, ओमप्रकाश बाहेती यांची निवड करण्यात आली असून सदस्य डॉ. ओमप्रकाशजी करवा, रत्नलालजी भुतडा, लक्ष्मीनारायण भुतडा, भगवान भुतडा, सुभाष सारडा, ओमप्रकाश भुतडा, बालाप्रसाद दरक, जगदीश भुतडा, मथुरादास भुतडा, पुरुषतम भुतडा यांची कार्यकारणी घोषीत करण्यात आली. व नविन अध्यक्ष राजकुमार मुदंडा यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment