तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 November 2019

राज्यकर्त्यांनो सत्तेचे गृहाळ सोडा आणि राज्यकर्त्यांनो शेतकरी वाचवा


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : शेतकर्यांचा हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने निघुन गेल्याने शेतकरी उभ्या पिकाला पाहून धाय मोकलून रडतो आहे 
राज्यकर्त्यांनो सत्तेचा खेळ लवकर संपवा. शेतकरी आपल्या तोंडाशी आलेल्या घासाला अतिवृष्टीमुळे मुकला असून तो धाय कोलमडून रडतो आहे. त्याला वाचविण्यासाठी राज्यकर्त्यांनी ताबडतोबीने राजकारणाचा तमाशा थांबविण्याची गरज आहे.
महायुती, महाआघाडीच्या नावाने राज्यात निवडणूका एकत्रितपणे लढविल्या जातात. त्यानूसार जागावाटप देखील केले जाते. निवडणूक प्रचारात सर्व झेंडे एकत्र करून प्रचार केला जातो. परंतु निवडणुका संपल्या, निकाल जाहीर झाले की महायुती तुटते, मंत्रीमंडळ गठीत होत नाही. मुख्यमंत्री ठरत नाही असे का होते ? म्हणजे राज्य कारभार  करतात की गल्लीतल्या क्रिकेट खेळणार्‍या पोरांप्रमाणे रडीचा डाव खेळतात यावर सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. राज्यकारभार करण्यासाठी निवडून दिलेले कारभारीच अशा प्रकारचा तमाशा राज्यातील जनतेसमोर मांडत असतील येणार्‍या काळात मतदार महायुतीच्या संदर्भात विचार केल्याशिवाय राहणार नाही. निकाल जाहिर व्हायला एक आठवडा उलटला आहे. आमचं ठरलय, आमचं ठरलय च्या सेनाच्या घोषणा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मीच मुख्यमंत्री होणारची अहंकारी भाषा मागे हटायला तयार नाही. 2014 च्या विधानसभेच्या निकालानंतर देखील 40 दिवस सत्ता स्थापनेचा ‘महाघोळ’ सुरू होता. सडलेली युती सुगंधित झाली होती आणि आता 2019 च्या निकाला नंतर देखील तशाच प्रकारची सत्तेची लढाई सुरू आहे दुसरीकडे राज्यातील शेतकर्‍यांच्या उभ्या ज्वारी, बाजरीला कोंब फुटताहेत. तोंडाशी आलेला घास गुराचे वैरण झाल्याने शेतकरी उभ्या पिकाला पाहून धाय कोलमडून रडतो आहे. त्यांचा ‘हुंदका’ राज्यकर्त्यांच्या सत्तेच्या मस्तीत कुणालाही ऐकू येत नाही हे राज्यातील बळीराजाचे दुख: आहे. सोयाबिन, कपाशी, ज्वारी, बाजरी, मका या पिकांना कोंब फुटले असून हिरव्या मिरच्या, भाजीपाला सडतो आहे.  रब्बी हंगामाचा काळ आला तरी देखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. पोळा सणाच्या काळात येणारे मुग, उडिद, चवळीची पीके आधीच नष्ट झालीत. ते नुकसान सहन करत शेतकरी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका पिकांची आस धरून जीवंत होता. परतिच्या पावसानं या पिकांचीही पूरती वाट लावली. इतकेच नाही तर ज्या कपाशीच्या पिकवर शेतकरी बाजारातुन बियाणे, खत, फवारणीची औषधे उधार घेतो ती कपाशी सुध्दा हातातुन गेल्याचे चित्र राज्यात आहे. कपाशीच्या बोंडामधून कोंब फुटले असून शेतकरी पूर्णपणे खचला आहे. त्याला समोर काहीही दिसत नाही. जे धान्य कापणीला आले होते त्याला कोंब फुटल्याने कापणी करायची कशासाठी ? असा यक्ष प्रश्न त्याचे समोर उभा आहे. कारण कापणीचा खर्च करण्यासाठी सुध्दा त्याचे जवळ पैसा नाही. रब्बीचे पीक घेण्यासाठी मशागत करायला, बियाणे, खते घ्यायला पैसा नाही. आधिच कर्ज काढून शेतात पिके उभी केली होती ती परतीच्या पावसाने हिरावून नेली. शेतकरी आर्थिक परिस्थितीने संपला अशी परिस्थिती सर्वत्र आहे. सलाम त्या बळीराजाला की जो अजुनही मोठया हिमतीनं जीव मुठीत घेवून उभा आहे. परंतु तो पूर्ण खचून जाईल तिथ पर्यन्त राज्यकर्त्यांनी त्याची सत्वपरिक्षा पाहु नये असे आम्हाला वाटते. अरे सत्तेपेक्षा शेतकर्‍या पर्यन्त धावून जा. खुर्ची मिळाली नाही तरी चालेल परंतु ताबडतोबीने युध्द पातळीवर एका आठवड्याच्या आत पंचनामे करून राज्याच्या प्रमुखा पर्यन्त अहवाल पोहचेल अशी यंत्रणा जिल्हाधिकार्‍यांनी  राबविण्याची गरज आहे. राज्यकर्ते सत्तेच्या मस्तीत तेल लावून हौदात उतरून, मांड्या ठोकत आहेत परंतु त्यांना संकटात सापडलेला शेतकरी दिसत नाही. कोंब आलेली पिके दिसत नाही. कारण त्यांनी कधीच शेतीचा बांध सुध्दा पाहिलेला नाही. वरण-भात खाणार्‍याचे सरकार शेतकर्‍यांच्या वेदना समजू शकत नाही हे या राज्यातील शेतकर्‍याचे दुर्दैव आहे. एक मात्र नक्की लक्षात ठेवा राज्यकर्ते मस्तीत आले तरी बळीराजाचा शाप घेण्यापर्यन्त सत्तेच्या  मस्तीत रमू नका. ज्या दिवशी या देशातील शेतकर्‍यांचा ‘कोप’ होईल त्या दिवशी कोणतेही खोटारडे सरकार सत्तेवर दिसणार नाही. ‘बळीचे’ राज्य येण्याचे दिवस जास्त लांब नाहीत. परंतु आता शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्याची नितांत गरज आहे. आता कोणताही अभ्यास करू नका. वेळ वाया घालवून टाईमपास करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ सुध्दा चोळू नका. तात्काळ सत्तेचा तमाशा थांबवा आणि ताबडतोबीने पंचनामे करून सरळ शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा करा. त्याचं मुडलेल कंबरड किमान सरळ होईल इतका तरी हेक्टरी निधी त्याला द्या. त्यात काटकसर करून नका

No comments:

Post a Comment