तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाई मिळन्यासाठी आक्रमकऊपविभागिय अधिकारी यांना निवेदन सादर

फुलचंद भगत
मंगरूळपीर-परतीच्या पावसाने तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतल्याने शेतकरी हतबल झाला असुन प्रशासनाकडुनही शेतकर्‍यांना हवा तसा दिलासा मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असुन नूकसानीची त्वरीत पाहणी करुन सरसकट मदत मिळन्यासाठी येथील ऊपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
            सन २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबरच्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले.प्रशासनाकडुन झालेल्या नुकसानीची त्वरीत पाहणी करुन सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली होती परंतु प्रशासनाकडुन पंचनामा करन्यासाठी पाहीजे तशी गती मिळत नसल्याने आणी शासनाच्या  नूकसान भरपाईच्या ऊदासिन धोरणामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आणी दिनांक ५ नोव्हेंबर रोजी शांततामय मार्गाने रास्तारोको करन्याचा प्रशासनाला ईशारा दिला होता परंतु पोलिस प्रशासनाकडुन निवेदनकर्त्यांनाच नोटीसा देवून रास्तारोको आंदोलन न करन्यासाठी बजावले त्यामुळे सबंधित शेतकर्‍यांनी वरिष्ठाकडे धाव घेवून न्याय मागीतला आणि वरिष्ठाकडुनही निवेदनाची तात्काळ दखल घेवून सरसकट पंचनामे करुन नूकसान भरपाई मिळणेसाठी प्रशासनाकडुन सर्वतोपरी मदत करन्याचे आश्वासन दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेवुन प्रशासनावर भरवसा ठेवला परंतु तरीही प्रशासनाच्या धिम्या गतीच्या कार्यप्रणालीमुळे शेतकरी आक्रमक झाल्याने दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सर्वांनी तहसिल कार्यालयावर जमुन प्रशासनाला जाब विचारला त्यामुळे वरिष्ठांनी सबंधित कर्मचार्‍यांना आदेशीत करुन त्वरीत पंचनामे करन्याचे आदेश दिलेत.शेतकर्‍यांना न्याय मिळावा याकरीता गिंभा,जनुना,मोहरी,धानोरा,चेहेल,कोठारी,कवठळ,दाभा,सायखेडा तसेच मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी संघटीत होवुन प्रशासनाला निवेदनाव्दारे नुकसानभरपाई मागत आहेत. आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रशासनाकडे दाद मागतो आहे परंतु या निगरगठ्ठ प्रशासनाला जाग येत नाही याविषयी शेतकर्‍यामध्ये रोष व्यक्त होत असुन या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमध्ये शासनाने वेळीच दिलासा न दिल्या शेतकर्‍यांच्या संघटीत आंदोलनाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असे शेतकरी बोलत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment