तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

स्वयम घोषित नेत्यांन मुळे प्रस्थापित नेतृत्वाची पडझड


डोणगांव :-- परिसरातील भा. ज. पा. चे स्वयम घोषित नेत्या मध्ये दिवसान दिवस वाढ होत आहे आणि यांच्या दिखावु पना मुळे जुने आणी कार्यक्षम प्रस्थापित भा. ज. पा. कार्यकर्ता यांच्या नेतृत्वाची पडझड होत असल्याचे दिसून येते आहे. भा. ज. पा. हे शिस्त प्रिय पक्ष म्हणून ओळखले जाते. परंतु डोणगांव परीसरात काही काळा पासुन काही  कार्यकर्त्यांनी स्वतः ला मोठे नेते व पदाधिकारी स्वयम घोषित करून काही पार्टी पत्रकारांना हाताशी घेऊन कोठे मीठाई वाटताना तर कोठे एक दोन रूग्नाला फळे वाटतांनी आपले फोटो काढून वृत्तपत्रात प्रसिद्धी करीत आहेत परंतु या मध्ये जे जुने कार्यकर्ते आहे त्यांना डावलले जात आहेत त्यामुळे मुख्य प्रवाहातले कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाजुला झाल्याचे दिसत आहेत व याच कारना ने या परीसरातील भा. ज. पा. कडे येनारा युवा वर्ग हा दुसर्‍या पक्षा कडे वळतांनी दिसत आहे. काही काळा पुर्वी भा. ज. पा. ने डोणगांव परीसरात स्वतः जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक लढवली होती परंतु पराभवा स्विकारावा लागला परंतु तेव्हा पासून कमीत कमी पार्टी ला ओळख व चांगले दिवस आल्याचे दिसत होते परंतु काही दिवसांपासून स्वयम घोषित नेते व पदाधिकारी यांच्या मुळे पक्षाला दुसर्‍यांचा सहारा घेण्याची वेळ येत आहे ज्या मुळे जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी चे सुर दिसत आहेत. आणि हाच प्रकार परिसरात राहीला तर या स्वयम घोषित नेत्या मुळे भा. ज. पा. ची कायमस्वरूपी पडझड न व्हावी असे चित्र दिसत आहे. मात्र हा सर्व प्रकार काही वरिष्ठ नेत्यांना माहीत असुन सुद्धा ते या कडे लक्ष दिले जात नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. परंतु हा प्रकार गांव स्थराचा असल्या मुळे हे वरिष्ठ नेते याचा आनंद तर घेत नसावे का असी चर्चा परीसरात होताना दिसते.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment