तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लीमिटेड चेन्नई उप शाखा अंबाजोगाई यांच्या वतीने विद्यार्थींच्या खात्यात शिष्यवर्तीचे पैसे जमा झाले- वैजनाथ तांबडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लीमिटेड  चेन्नई , भारत यांच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या  पालकांकडे चारचाकी ड्रविंग लायसन असेल अशा 8वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांनी वैजनाथ कॉलेज परळी,वै या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन आपले शिष्यवर्ती फॉर्म संबंधित कंपनी धारक एजंट यांच्या कडे दाखल केले होते ; सामाजिक दा यित्व या उपक्रमाखाली शिष्यवृत्ती असल्याने ती मिळणार नाही अशी भावना तयार झाली होती,व ही संकल्पना अखेर  धुसर होत चालली होती ;परंतु मागील महिन्यात विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 3000 हजार व 3500/- या प्रमाणे पैसे जमा झाले आहेत अशी माहिती सामाजिक उपक्रम शील व्यक्ती श्री वैजनाथ तांबडे सर ( तळेगाव ) , अॅड, विठ्ठल तोंडे ( अंबाजोगाई ) यांनी कळविले आहे : हा लाभ परळी,वै तालुक्यातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना झाला आहे, या वर्षी प्रमाणे पुढील वर्षी  पण आपण हा उपक्रम राबवण्याची विनंती   कंपनी कडे करणार असल्याचे वैजनाथ तांबडे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment