तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

प्रशासनाच्या कृपेने मेहकर उपविभागात पालकमंत्री यांची खोलीबंद आढावा बैठक!प्रसार माध्यम प्रतिनिधि,शेतकरी किव्हा शेतकरी प्रतिनिधी यांना ठेवले नुकसानीच्या अढावा बैठकी पासून अलिप्त.

प्रशासनाचे पितळ उघडे पडूनये यासाठी बाहेर माहिती होवूनदेता खोलीबंद आढावा बैठकीचे आयोजन.

दौरा प्रशासनिक की राजकीय याची चर्चा रंगली अढावा बैठकीला राजकीय पदाधिकारीच हजर असल्याने हा दौरा कोणता.

मेहकर ४
परतीच्या पावसाने मेहकर व लोणार तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केले पिकाचे नुकसान,शेती खरडून गेली,बांध फुटले, गावांशी संपर्क तुटले, शेतकरी तुटला मात्र अश्यात प्रशासन व शासन मात्र शेतकऱ्यांन सोबत पोरखेळ मांडत आहे असे पाहायला मिळते  जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी परतीच्या पावसाचाने झालेल्या नुकसानीची अढावा खोलीबंद अढावा बैठक घेतली ना शेतकरी प्रतिनिधी,ना प्रसार माध्यम प्रतिनिधी,ना बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी फक्त कागदावर अढावा बैठक वाह रे प्रशासन अश्या प्रतिक्रिया मेहकर उपविभागात उमटत आहेत.
    परतीच्या पावसाने मेहकर व लोणार तालुक्यात हाहाकार माजवला शेकडो गावात पाण्याने शेतीचे व घरांचे नुकसान केले शेतकरी कोलमडून गेला आस्मानी संकट दुर सारण्या साठी  शासन समोर येईल असा विश्वास जनतेला वाटत असतांना 3 अक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ संजय कुटे यांचा परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे आढावा घेण्या साठी मेहकर उपविभाय अधिकारी यांच्या कार्यालयात आले बंद खोलीत आढावा बैठक प्रशासनाच्या कृपेने घेण्यात आली प्रत्येशात बांधावर जाऊन नुकसान न पाहता किव्हा शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी आणि प्रसार माध्यम यांच्याशी भेट न घेता सरळ आढावा बैठक बोलावली मात्र या आढावा बैठकी मध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते तेव्हा अश्या प्रकारच्या आढावा बैठकी म्हणजे राजकीय बैठकी की प्रशासनिक बैठक हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे यावर मेहकर तालुक्यातील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याच्या पाहायला मिळत आहेत.
      शासन आणि प्रशासनास जर प्रत्येक्षात परतीच्या पावसाने शेतकरी व सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची फिकीर असती तर त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या असत्या त्यात बांधावर जाऊन सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची विचारपूस केली असती व प्रसार माध्यम जे शेतकऱ्यांन वर व सामान्य माणसावर होणारे अन्यायाला नेहमी वाचा फोडतात अश्या प्रसार माध्यमाला सुद्धा दूर ठेवण्यात  आले कारण प्रशासनाची कुचकामी वृत्ती जनते समोर आली असती ती येउद्यायची नाही म्हणून बंद खोलीत आढावा बैठक घेण्यात आली तर पालकमंत्र्यांनी सुद्धा प्रसार मध्यम प्रतिनिधी व शेतकरी का नाही याची तजवीज घेतली नाही फक्त आपल्या पक्षाचे पदाधिकारी आपल्याला भेटले यांच्यातच धन्यता मानली.
    प्रसार माध्यम किव्हा शेतकरी व शेतकरी प्रतिनिधी जे भेडसावणाऱ्या समस्या व त्यांच्या मागण्या याबद्दल पालकमंत्र्यांशी चर्चा केली असती तेव्हा त्यांना का बोलावले गेले नाही असे विचारले असता यावर मेहकर उपविभागीय महसूल अधिकारी गणेश राठोड  यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की मीडिया ला बोलावण्या बद्दल कोणते ही निर्देश नव्हते, अंतर्गत आढावा बैठक असल्या मुळे बोलावले नव्हते असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment