तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

विद्यावर्धिनी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो, विद्यावर्धिनी विद्यालयात देखील संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले तसेच सौ.गायकवाड,आत्माराम मुंडे,हंगरगे व मातेकर सर यांनीदेखील संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती सांगितली .त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थांना संविधानाची शपथ देण्यात आली .या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री मातेकर सर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.गायकवाड,सौ.मनकुलवर, आत्माराम मुंडे ,कांबळे सर व्यासपीठावर उपस्थित होते.

No comments:

Post a comment