तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी जनार्धन गिते (मामा) यांचा निरोप समारंभकेज (प्रतिनिधी) :- 
      येथील उपजिल्हा रुग्णालयातील चतुर्थ कर्मचारी यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.

         या बाबतची माहिती अशी की, सन १९९५ मध्ये तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशपांडे यांच्या कार्यकालात केज ग्रामीण रुग्णलयात चतुर्थ पदावर रुजू झाले. त्यांनी डॉ. अशोक थोरात, डॉ. शिंदे, डॉ. सय्यद, डॉ. जायभाये, डॉ. सावळकर, डॉ. भिसे, डॉ. लांडे, डॉ. साळुंके, डॉ. केंद्रे यांच्या काळात प्रामाणिकपणे व चोख सेवा केली. ते विहित वयोमर्यादे नुसार दि. ३१ ऑक्टोबर रोजी ते सेवा निवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर ते कार्यामुक्त होताच त्यांना उपजिल्हा रुग्णालय केजच्या वतीने निरोप देण्यात आला. या वेळी त्यांचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. केंद्रे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. चाटे, डॉ. भिसे, डॉ. करपे, डॉ. सावंत, डॉ. वासुदेव नेहरकर, श्रीकृष्ण नागरगोजे, दगडू गालफाडे, सरपंच कैलास जाधव, जगताप यांच्यासह बाराते, लोंढे मॅडम, सुजित शिंदे, राऊत, कुलकर्णी मॅडम, नाना, बजगुड, आशाबाई, जाधव मॅडम, अमर मुळे, भागवत मुळे, राजकुमार गित्ते, अर्जुन गित्ते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


या प्रसंगी अनेकांनी जनार्धन गित्ते मामा यांच्या सोबत काम करताना व त्यांच्या सहवासातील अनुभव कथन केले. या निरोप समारंभाच्या सत्काराने जनार्धन गित्ते हे भारावून गेले.

No comments:

Post a comment