तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसाग्रस्त पिकांची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी


बुलडाणा. : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे काढणी अवस्थेत असताना मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातही नुकसानीचा आवाका खुप जास्त आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज ३ नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. किनगांव राजा, साखरखेर्डा, शेंदुर्जन ता. सिंदखेड राजा, लव्हाळा ता. मेहकर येथील शेतांची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
  लव्हाळा फाटा येथील शेतात सोयाबीनच्या पाण्यात भिजलेल्या सुड्यांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी अशा अवस्थेतील सोयाबीन काढणीबाबत चर्चा केली. तसेच सिंदखेड राजा येथील विश्राम गृह येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून तालुक्यात सुरू असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची परिस्थिती जाणून घेतली. यंत्रणांनी तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment