तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नूकसान; आयुक्ताकडून पाहणी

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २ _ अवकाळी पावसाने सर्वत्र थैमान घातले असुन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरू करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिब्द असल्याचे मत विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सांंगितले.
                याविषयी सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्राच्या अनेक भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेवराई तालुक्यात परतीच्या पाऊसाने थैमान घातले असुन अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे, त्यामुळे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी शनिवार रोजी गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी, बागपिपंळगाव तसेच तालखेड येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पहाणी केली होती, यावेळी जिल्हाधिकारी आस्थिकुमार पांडे, आ.लक्ष्मण आण्णा पवार, तहसीलदार धोंंडिबा गायकवाड, कृषी अधिकारी ढाकणे, गटविकास अधिकारी बागुल, ना.तहसीलदार अशोक भंडारी आदि उपस्थित होते. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment