तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 November 2019

दुष्काळावर मात करत नंदागौळच्या शेतकर्‍याने घेतले मिश्र फळबागेतुन नऊ लाखाचे उत्पन्न ; ग्लोबल इंडिया व डॉ.बावस्कर टेक्नॉलॉजीचे मार्गदर्शन

प्रतिनिधी:- महादेव गित्ते -
--------------------------------

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
यावर्षीच्या उन्हाळ्यातील दुष्काळामुळे परळी तालुक्यातील फळबागा उध्वस्त झालेल्या असतांना अशा या भिषण परिस्थितीत नंदागौळ येथील गित्ते कुटुंबाने अत्यल्प पाण्यावर पपईची लागवड केली व यामध्ये टरबूजाचे अंतरपिक घेऊन दोन एक्कर मध्ये आतापर्यंन्त सात लाखाचे उत्पन्न मिळविले असुन पपईचा तिसरा भरणा तोडणीस आलेला आहे. हे उत्पन्न मिळवून या सव्वा दोन एक्करामध्ये नऊ लाखाचे उत्पन्न होत आहे. यासाठी ग्लोब इंडियाचे मयांक गांधी यांचे सहकार्य व डॉ.बावस्कर टेक्नॉलॉजीचे बुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले असुन नंदागौळ येथील या शेतकर्‍यांचा आदर्श इतर गावातील शेतकरीही घेत आहेत.
नंदागौळ येथील शेतकरी संदिप रमेश गित्ते यांना नंदागौळ शिवारात जमिन आहे. डोंगराळ व खडकाळ भाग असल्याने आतापर्यंन्त या जमिनीवर केवळ खरीप हंगामातील पिके घेतली जायची दोन वर्षापुर्वी ग्लोबल इंडियाचे मयांक गांधी यांनी परळी तालुक्यात आपले पाणी फाऊंडेशनचे व फळबाग लागवड मदतीसाठी कार्य सुरु केले. संदिप गित्ते यांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले. विहिरीमध्ये अल्प पाणीसाठा असल्याने त्या पाणीसाठ्यावर यावर्षीच्या उन्हाळ्यात कोणते पिक घ्यावे या विचारात असतांनाच मयांक गांधी यांनी तैवान जातीचे 2 हजार पपईचे रोपटे उपलब्ध करुन दिले. ही रोपे 6 बाय 8 अशा अंतरावर सव्वा दोन एक्कर मध्ये फेबु्रवारी 2019 मध्ये लावली. उन्हाळ्यामध्ये मल्चींग पेपर व ठिंबक सिंचनचा वापर करत या पपईमध्ये टरबुजाचे अंतरपिक घेतले. टरबुजापासुन त्यांना 2 लाख रुपयांचा नफा झाला तर आतापर्यंन्त पपईच्या दोन पिकांच्या पाळ्या तोडणीस आल्या असुन यातुन 5.5 लाख रु.चा नफा झाला. व सध्या तिसरी फळ तोडणी होत आहे. सदरील फळबाग जोपासण्यासाठी 2.लाख रु. खर्च आला असुन पपईचे पिक यशस्वी झाल्याने संदिप गित्ते यांनी आणखी चार हजार पपईची रोपे लावण्याचा निर्धार केला आहे. याबरोबरच 1 हजार सिताफळाची झाडे, 150 केशर आंबा, 750 कागदी लिंबु, 6500 झेंडुच्या रोपांची लागवड केली आहे. संदिप गित्ते यांचीही फळबाग यशस्वी झाल्याने अनेक शेतकरी भेटी देत आहेत. यात रामराव गित्ते, राम गित्ते, शाम गित्ते, अरुण गित्ते, अनिल गित्ते, सुधाकर गित्ते, वसंत गित्ते, नागनाथ गित्ते यांच्यासह विदेशी नागरिकांनीही भेटी दिल्या. व काही शेतकर्‍यांनी फळबागेचा हा प्रयोग आपणही करणार असल्याचे सांगितले.
********
90 लाख लिटरचे शेततळे बनविले
पपईसह शेवगा, लिंबूनी, केशर आंबा, हळद, झेंडू व आवरा या पिकांच्या जोपासणीसाठी आपल्या शेतामध्ये शासकीय योजनेतुन 110 बाय 110 चौरस फुटात 90 लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारुन यात सध्या 50 लाख लिटर पाणीसाठा झाला आहे. परतीच्या पावसाने विहिरीलाही बर्‍यापैकी पाणी आल्याने येणार्‍या उन्हाळ्यात ही फळबाग जोपासता येईल असे शेतकरी संदिप गित्ते यांनी सांगितले.

नंदागौळची पपई दिल्लीच्या बाजारपेठेत
शेतकरी संदिप गित्ते यांनी लागवड केलेल्या तैवान जातीच्या पपईला मोठी मागणी असुन उत्कृष्ट नियोजनामुळे पपईचे पिक उत्तम प्रतिचे झालेले आहे. सदरील पपईसाठी बाजारपेठ उलब्ध करण्यासाठी मयांक गांधी यांच्याबरोबरच वडिल रमेश गित्ते, प्रदिप गित्ते, मोहन गित्ते यांचे मार्गदर्शन लाभले व या पपईला दिल्लीच्या बाजारपेठेत 35 ते 45 रुपयांपर्यंन्त भाव मिळाला. यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. पपईच्या फळबागेतुन पुढील वर्षभरास 10 ते 12 लाख रु.चे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a comment