तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

बालाजी माध्यमिक विद्यालयात सविधान दिन साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-मराठवाडा बहुद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्था परळी वैजनाथ संचलित,  बालाजी माध्यमिक विद्यालय सेलु (परळी) ता परळी वैजनाथ येथे  आज 26 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय संविधान दिन  मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. भारताचे थोर विचारवंत व लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर यांनी केले व संविधान दिन चे महत्व समजून सांगितले, व इतर विविध उपक्रम  साजरे करण्यात आला त्यामध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. तत्पूर्वी 26/11 च्या मुंबई वरील हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या वीरा ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोदाम सर यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुंडे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment