तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

तालुका कृषी कार्यालयात हरभऱ्याचे परमीट मिळण्याकरिता शेतकऱ्यांचा आटापिटा


अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संतापले

पोलिसांच्या उपस्थितीत परमिटचे झाले शांततेत वितरण  
विशाल नांदोकार
तेल्हारा : कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात घेतली जाते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य देण्यात येते. हरभऱ्याचे पाकेट शेतकऱ्यांना अनुदानावर मिळते त्याकरिता परमिटची गरज असल्यामुळे परमिट मिळण्याकरिता शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयात आटापिटा सुरु असून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना शांत करण्याकरिता तेल्हारा पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.

हरभऱ्याची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी आपणास सुधारित जातीच्या बियाण्यांचा वापर, योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणेही काळाची गरज आहे. अलिकडच्या काळात हरभऱ्याचे विकास, विश्वास, फुले-जी 12, विजय, विशाल, विराट, विहार, कृपा, दिग्विजययासारखी भरपूर उत्पादन देणारे आणि रोगप्रतिकारक नवनवीन सुधारीत वाण प्रसारित झालेली आहेत. सुधारित वाणांचा प्रसार होवून सुद्धा शेतकरी आपल्याकडीलच बियाण्यांचा पेरणीसाठी उपयोग करतात. अशा बियाण्यांची उगवणशक्ती, भौतिक शुद्धता आणि जोम कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हरभऱ्याचे अधिक उत्पन्न मिळेल. सुधारित वाणांमध्ये सुद्धा शुद्ध व दर्जेदार बियाणे वापरणे गरजेचे असते. शेतकऱ्यांना अनुदानावर हरभऱ्याचे बियाणे मिळते याकरिता महाबीजचे परमिट आवश्यक असते त्याकरिता शेतकरी तालुका कृषी विभागाच्या कार्यालयावर तौबा गर्दी करिता आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागते वेळ आल्यास खाली हात सुद्धा परतावे लागते त्यामुळे आज शेतकऱ्यांचा संयम उतून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उपस्थित लोकजगारचे तालुका अध्यक्ष अमोल जवंजाळ यांनी अधिकाऱ्यांची कानउघाळणी करून अधिकचे टेबल वाढवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख, सुधाकर गवारगुरु, तसेच हेकॉ राजू इंगळे यांनी शेतकऱ्यांना शांत करून शांततेत परमिटचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a comment