तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

गेवराई : शेतकर्‍यांनी गावातच अर्ज सादर करावेत - आ. लक्ष्मण पवारसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २ _ तालुक्यातील शेतकर्‍यांनी काळजी करु नये, शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे अर्ज आज रविवार, दि. ३ नोव्हेंबर पासून गावातच स्वीकारले जातील, तशी व्यवस्था करण्यात आली असून, गाव सोडून शहरात येऊ नका, असे आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे केले आहे.
          शनिवार रोजी दुपारी गेवराई येथील कृषी कार्यालयात आ.पवारांनी तातडीने बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज भरून घ्यावेत अशा सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आप आपल्या गावांत थांबूनच आपल्या तक्रारी द्याव्यात असे आवहान आ. लक्ष्मण पवार यांनी बैठकी दरम्यान बोलताना केले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी पिकविमा पासून वंचित रहाणार नाही याची दक्षता घेईल असे आश्वासनही  आ.लक्ष्मण पवार यांनी शेतकऱ्यांना दिले आहे. सततच्या संकटाने शेतकरी ञस्त झाला आहे, परतीच्या पावसाने थैमान घातले असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तातडीने अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी कृषी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीस तहसिलदार धोडिबा गायकवाड, कृषी अधिकारी ढाकणे, गटविकास अधिकारी बागुल, अशोक भंडारे, पञकार उपस्थित होते 
      यावेळी बोलताना आ.पवार म्हणाले की, गेवराई तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विमा कंपनीची अर्ज स्विकरण्यासाठी तलाठी, मडंळधिकारी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत.  दि. ३ नोव्हेंबर पासून सर्व आधिकारी आप आपल्या गावांत येतील तिथेच आपण आपले अर्ज  त्यांच्याकडे दाखल करावेत. अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात येण्याची गरज नाही असे आ. लक्ष्मण पवार यांनी सांंगितले. यावेळी शेतकरी, अधिकारी यांची उपस्थिती होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment