तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती व विद्यानगर भागात भारतीय संविधान दिन साजरा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती व विद्यानगर भागात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.आज दिनांक 26/11/2019 वार मंगळवार रोजी संस्कार प्रा. शाळा पद्मावती गल्ली परळी वै. येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला या निमित्त शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली त्याच बरोबर संस्कार शाळा ते रानिलक्ष्मीबाई टॉवर चौक रॅली काडून टॉवर चौकात सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपक तांदळे सर हे तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकडे  सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधान वाचन करून करण्यात आली. 
 उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपक तांदळे सर म्हणाले की, संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 22 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. मुळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश केला होता. संविधान सभेने संविधानास मान्यता दिली. हे संविधान 1949 रोजी राष्ट्राला अर्पण केले. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्विकार करण्यात आले. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान म्हणजे आपली आचार संहिता आहे. आचारातून आपल्याला शिक्षण मिळते ते शिक्षण हे आपल्या जीवनाचा पाया आहे. विद्यार्थी आणि नागरीकांनी संविधानाची परिपुर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कारण संविधान हा आपल्या देशाचा प्रमुख ग्रंथ आहे. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात संविधानाचा प्रभाव आहे. 1950 साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर आधारीत आहे. यावेळी परळी शहरांत संविधान रॅली काढून राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले. या नंतर शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच यावेळी शाळेत सामूहिक कवायत घेण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्कार प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment