तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 November 2019

एक बांधकाम मजूर ते पोलीस उपनिरीक्षक!
:-- मेहकर तालुक्यातील जवळा        येथील गजानन लोकडे याने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले.
:-- अब्याच्या  झाडावर केलेल्या मचाणावर बारावीचा अभ्यास तर

:--  मिस्त्रीच्या हाताखाली काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी असे दिव्य पेलून तो झाला पोलीस उपनिरीक्षक.

डोणगांव :-- ३०
डोणगाव पासून पाच किमी अंतरावर असलेले ग्राम जवळा येथील गजानन प्रताप लोकडे यांच्या घरी गरिबी पाचवीला पुजलेली गावात काम नाही म्हणून काम करण्या साठी नाशिक गाठलेल्या प्रताप शंकर लोकडे यांच्या दोन्ही पुत्रांनी 'मेहनत करणेवालोकी कभी हार नही होती' या ओळीला स्वकर्तुत्वाने सिद्ध करून दाखविले एक आर्मीत तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक झाला तेही कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता.
     जवळा येथील प्रताप लोकडे हे कंत्राटी वनमजुर म्हणून काम करीत होते मात्र काही २०१३ मध्ये कंत्राटी काम बंद झाले अश्यात लोकडे दाम्पत्याने गाव सोडून मोल मजुरी साठी करण्या साठी नाशिक गाठले आणि जेव्हा नाशिक येथून परतले तेव्हा त्यांना जीवनाची कमाई मिळाली. प्रताप व सुनीता लोकडे दाम्पत्याला दोन मुले यातील मोठा गजानन लोकडे तर लहाना गणेश लोकडे गजानन लोकडे याने जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची सुरवात केली नंतर गावातल्याच हायस्कुल मध्ये १० परियांतचे शिक्षण घेतले आणि १० नंतर डोणगाव येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आला बारावी चांगल्या गुणाने पास झाल्यावर बुलढाणा येथे डी एड केलं अश्यात प्रताप लोकडे हे कंत्राटी वन मजूर म्हणून काम करीत होते मात्र त्यांचे काम बंद झाले तेव्हा त्यांनी कामा साठी गाव सोडून नाशिक गाठले तेथे लोकडे दाम्पत्य मोल मजूरी करीत आपले पोट भरत त्यांच्या सोबत दोन्ही मूल सुद्धा कामाला जात अश्यात    गजानन याने डी एड सोबत मुक्त विद्यापीठ मधून बीए सुद्धा पूर्ण केलं आणि स्पर्धा परिक्षेच्या  तयारीला लागला तयारी ही अशी की दिवसा काम करायचे रात्री अभ्यास कधी काम नाही मिळाले तर त्या दिवशी अभ्यास असा गणेश व गजानन यांचा नित्यक्रम यात स्पर्धा परीक्षेत गजानन याची निवड २०१५ मध्ये आरोग्य सेवक,२०१७ मध्ये मंत्रालय सहायक,जी प शिक्षक २०१८ व २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक अशी भरारी गजानन लोकडे याने घेतली यात मंत्रालय मध्ये सहाय्यक हीच नौकरी गजानन याने तीन महिने केली मात्र त्यात त्याचे मन रमले नाही त्याने पुन्हा तयारी सुरू केली आणि पोलीस उप निरीक्षक झाला तर लहाना भाऊ गणेश हा २०१७ ला आर्मीत भरती झाला आणि लोकडे दाम्पत्याच्या कष्टाची चीज होऊन त्यांना जीवनभराची कमाई मिळाली.

(मी स्वःताहाच्या मेहनतीवर स्पर्धा परीक्षेत यश मिळवले कारण मला माझे आई वडील मिस्त्रीच्या होताखाली काम करीत असतानाचे मी माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांच्या मेहनतीचे परिश्रमाचे फलित म्हणून मला यश मिळवायचे होते आणि ते मी मिळवले गजानन लोकडे पोलीस उपनिरीक्षक)


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment