तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

परळी रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचे होउ नये विद्रुपीकरण - परळीकरांची भावना ; राहो निरंतर....रुप मनोहर.. !परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    परळी रेल्वे स्थानकाला दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक भेट देणार म्हणून स्थानकावर व परिसरात  सुशोभीकरणाची मोठी कामे करण्यात आलेली आहेत.स्थानकाच्या आत आणि बाहेर रंगरंगोटी, छत्रपती शिवाजी महाराज, गांधीजी,वैद्यनाथ प्रभू यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत.  महापुरुषांची चित्रे,विविध फुलेआणि झाडे यांची चित्रे काढण्यात आली आहेत. मात्र नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर बकाल अवस्था न होउ देता कायमस्वरूपी 'स्मार्ट रेल्वे स्थानक' रहावे या भावना व्यक्त होत आहेत.

       जनरल मॅनेजर यांच्या स्वागतासाठी भलेही परळी रेल्वे स्थानकात अत्यावश्यक सुविधांसह स्वछता करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात सुरक्षा भिंती बोलक्या केल्या गेल्या आहेत.परिसरात असलेल्या उद्यानाची सुद्धा दुरुस्ती केली गेली आहे. एवढेच नाही तर रेल्वे रुळांची सुद्धा सजावट करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर जिथल्या तिथे संपूर्ण व्यवस्था व शिस्तबद्ध प्रशासन कधी नव्हे ते बघायला मिळाले. 
      दरम्यान कोणत्या का निमित्ताने असेना परळी रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचे होउ  विद्रुपीकरण नये अशी सर्वसामान्य परळीकरांची भावना असुन रेल्वे प्रशासनाने याकडे कायमस्वरूपी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एक प्रकारे 'स्मार्ट रेल्वे स्थानक' योजनेत समावेश असो की मिळालेले 'आयएसओ मानांकन ' या पार्श्वभूमीवर तरी परळी रेल्वेस्थानकाचे आजचे सुशोभित रुप 'राहो निरंतर....रुप मनोहर.. !' अशीच भावना सर्वांची आहे.

No comments:

Post a comment