तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधान निर्माता  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळराव काकडे तर प्रमुख पाहुणे डॉ विनोद जगतकर न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुनील लोमटे न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस आर देशमुख सर डॉ बी आर चव्हाण आधी मंचावर उपस्थित होते संविधान दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे महिला महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ विनोद जगतकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित राज्यघटनेची सविस्तर माहिती देऊन आजच्या परिस्थितीवर भाष्य केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज भारतात लोकशाही जिवंत आहे असे उद्गार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले तसेच याप्रसंगी डॉ बी आर चव्हाण एस आर देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉ गोपाळराव काकडे यांनी केले. यावेळी डॉ अंकुश वाघमारे यांनी संविधानाची शपथ सर्वांना दिली याप्रसंगी थर्मल कॉलनी येथे संविधान रॅली काढण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ एल आर मुंडे श्री अजय सोळंके सर प्रा ईश्वर कांबळे प्रा आघाव प्रा सानप प्रा विजय देशमुख प्रा लव्हाळे सय्यद मॅडम प्रा सौ बनसोडे मॅडम प्रा कु पुजा गायकवाड प्रा कु कांबळे मॅडम अमोल सरवदे दत्ता सौंदळे लता मिसाळ नखाते मामा व गणेश सोळंके आदींचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्रीहरी गुट्टे व आभार प्रा डॉ एल आर मुंडे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment