तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

हॉटेल व्यावसायातील भारतीय खेळाडु


आजचे क्रिकेटपटू क्रिकेट हा निव्वळ खेळ म्हणून खेळत नाहीत तर ते त्याकडे पूर्णपणे व्यावसायीकपणे झुकले आहेत. क्रिकेटचे वाढलेले प्रकार त्यामुळे क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढली. त्यातून अमाप पैसाही मिळू लागला. त्याच बरोबर क्रिकेटपटू आपल्या भविष्याचा विचार करू लागले. त्या पैकी अनेकांनी आपआपल्या परीने व्यावसाय निवडले.परंतु त्यापैकी काही जणांनी हॉटेल व्यवसायाकडे धाव घेतली. त्यातील बऱ्याच जणांना हा नवा धंदा रास आला नाही. तर प्रस्तुत लेखात आपण बघूया अशाच काही क्रिकेटमध्ये यशस्वी ठरून हॉटेलींगकडे वळलेल्या क्रिकेटपटूंकडे. 

                या क्षेत्राकडे पहिला खेळाडू ठरला क्रिकेटचा देव विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ! सचिनने हॉटेलींग फिल्डमधील पहिले हॉटेल उघडले ते सन २००२मध्ये या क्षेत्रातील मातब्बर नाव असलेल्या संजय नारंग यांच्या सोबतीने. मुंबईमध्ये सुरू केलेल्या हॉटेलचे नामकरणही " तेंडूलकर्स." त्यानंतर सचिनने " सचिनस " नावाचे दुसरे हॉटेल मुंबई व बंगळुरूला सुरू केले. 
                 या क्षेत्राकडे वळलेला दुसरा क्रिकेटपटू ठरला भारतीय क्रिकेटचा प्रिन्स,महाराजा व सर्वांचा लाडका दादा, अर्थात सौरव चांडिमल गांगुली. हाच गांगुली आज भारतीय क्रिकेटचा सर्वेसर्वा बनला आहे. सन २००४ मध्ये सौरवने एका कंपनीच्या साह्याने कोलकात्यात " सौरवज द फुड पॅव्हेलियन " हे हॉटेल सुरू केले. त्यानंतर दोनच वर्षात तो त्या हॉटेलचा पूर्ण मालक बनला. परंतु नंतर जसजसा कामाचा व्याप वाढत गेला तसतसे सौरवला हा व्यवसाय सांभाळणे जड जाऊ लागले. अखेर सन २०११ मध्ये हा सात वर्षापूर्वी सुरू केलेला व्यवसाय पूर्णपणे बंद केला. 
  
                झहीर बखतीयार खान हा भारताचा आजवरचा सर्वोत्कृष्ठ डावखुरा वेगवान गोलंदाज. भविष्याची सोय व सतत होणाऱ्या दुखापतीने त्रस्त झालेल्या झहीरने एक पक्का व्यवसाय करण्याचे ठरविले. त्याच शोधात त्याने हॉटेल व्यवसाय करण्याचे ठरविले. सर्वप्रथम सन २००४-०५ मध्ये पुण्यात " झेडकेज " नावाचे हॉटेल सुरू केले. त्यात चांगल्या पैकी यश मिळताच " बँक्वेट फोयर '' हे हॉटेलही त्याने विकत घेतले. क्रिकेटच सर्वस्व असलेल्या झहीरने व्यवसायालाही तितकेच महत्व देत आपली भविष्याची शिदोरीही तयार करून ठेवली. 
              भारताचा धडाकेबाज सलामीवीर व मुलतानचा सुलतान अशी ओळख लाभलेला विरेंद्र किशन सेहवागलाही हॉटेलींग व्यवसायाने आकर्षित केले. " सेहवागज़ फेवरेट " नावाचं शुध्द शाकाहारी हॉटेल त्याने दिल्लीत सुरू केले.परंतु या धंदयातील पार्टनरशी त्याची भागीदारी विस्कटल्याने त्याला न्यायालयापर्यंत धडक घ्यावी लागल्याने हॉटलींगच्या मैदानावरीलही त्याचा डाव अर्ध्यावरच मोडला. 
              भारताचा अष्टपैलू खेळाडू, मैदानावर फलंदाजी,गोलंदाजी क्षेत्ररक्षण व गमतीदार स्वभावाने सतत चर्चेत राहाणारा रविंद्रसिंग अनिरूध्दसिंग जडेजा देखील या व्यवसायाच्या मोहात सापडला. १२ डिसेंबर २०१२ रोजी त्याने त्याचे पहिले हॉटेल त्याने राजकोट शहरात सुरू केले. त्याची बहीण नैना ही त्या हॉटेलचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळते.परंतु ७ ऑक्टोबर २०१७ रोजी राजकोट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने छापा मारला, त्यामध्ये अनेक अयोग्य खाण्याचे पदार्थ आदळल्याने महापालिकेने त्याचा परवाना रद्द केला. 


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

No comments:

Post a comment