तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 November 2019

सौ.आशाताई बाजीराव ढाकणे शिक्षणमहर्षी शामराव दादा गदळे राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

 (प्रतिनिधी) :- मौजे दहिफळ वडमाऊली ता.केज येथील स्वर्गीय शामराव दादा गदळे शैक्षणिक संकुलात दिनांक १ नोव्हेंबर २०१९ शुक्रवार रोजी स्वर्गीय शामराव दादा गदळे यांच्या ४ थ्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.श्री संजय महाराज पाचपोर अकोला ,ह.भ.प.ज्ञानोबा माऊली महाराज विठ्ठलगड , ह.भ.प. केशव महाराज शास्त्री ,ह.भ.प.नाना महाराज कदम ,ह.भ.प.सुरेश महाराज जाधव बंकटस्वामी मठ संस्थान नेकनुर ,हभप लाड महाराज,प्राचार्य पी.डी.मुरकुटे,नंदकिशोर मुंदडा ,महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या डॉ.शालिनीताई कराड, समाजकल्याण सभापती संतोष हांगे ,जि.प.सदस्य डॉ.योगीनीताई थोरात , जि.प. सदस्य विजयकांत मुंडे , जि.प. सदस्य राणा डोईफोडे , शिवसेना युवानेते नितीन धांडे , प्राचार्य ईप्पर सर , डॉ.बालासाहेब कराड ,डॉ.शशिकांत दहिफळकर , प.स.सदस्य दत्तात्रय ठोंबरे, सरपंच सखुबाई मोरे,प्राचार्य जयश्री गदळे यांच्या हस्ते सौ.आशाताई बाजीराव ढाकणे यांना शिक्षणमहर्षी शामराव दादा गदळे राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 सौ.आशाताई बाजीराव ढाकणे यांनी श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जोला ता.केज जि.बीड माध्यमातून महिलांना व्यक्त होण्यासाठी  हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.  तसेच श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जोला ता.केज जि.बीड या संस्थेच्या वतीने महिलांसाठी त्यांनी एकापेक्षा एक अधिक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत महिला सक्षमीकरणामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. बालिका जन्माचे स्वागत, गरोदर मातांचा सन्मान व गर्भलिंग निंदान करणार नसल्याची नवविवाहित जोडप्याला शपथ, आरोग्य विषयक शिबीर व जनजागृती, गुणवंत्त मुलामुलींच्या स्वागत सन्मान सोहळाचे आयोजन , पाणी व जमिन यासाठी जनजागृती व कार्य,   जोला  ता.केज येथिल नदी व तीन ओढयात दिलासा संस्था,घाटंजी जि.यवतमाळ या संस्थेच्या मदतीने डोह निर्माण करून पाणी गावातच थांबवले,  वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विवीध स्पर्धा परिक्षाचे आयोजन, बचत गट, विवीध प्रशिक्षण शिबीरे ईत्यादी कार्य यशस्वीपणे राबवतात.या कार्याची दखल स्वर्गीय शामराव दादा गदळे शैक्षणिक संकुलाच्या पदाधिकारी मंडळी ने व निवड समितीने घेवुन राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला समाज भुषण पुरस्काराने सन्मानित केले.
 श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जोला ता.केज जि.बीड च्या सचिव सौ.आशाताई ढाकणे यांच्या या समाज कार्यासाठी  राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 या सन्मान सोहळात मान्यवर मंडळी च्या हस्ते श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, जोला ता.केज जि.बीड च्या सचिव सौ.आशाताई ढाकणे यांना सन्मानित करण्यात आले. दहिफळ ( वड.)ता.केज येथील शामराव गदळे महाविद्यालयाच्या प्रारंणात संपन्न झालेल्या कार्यक्रमात किर्तन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव घोळवे व तात्यासाहेब डोईफोडे यांनी केले.

No comments:

Post a comment