तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Wednesday, 6 November 2019

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना विक्रमी आघाडी;प्रभाग ४ मध्ये आभारफेरी ; घरोघरी जात पेढे वाटून आनंदोत्सव

  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     परळी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांना ऐतिहासिक विजय मिळाला. या विजयात प्रभाग क्रं 4 मधून विक्रमी अशी 2245 मतांची आघाडी दिल्याबद्दल प्रभागात आभारफेरी काढण्यात आली. घरोघरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाउन पेढे वाटून नागरीकांचे आभार मानले आहेत.
     परळी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार  धनंजय मुंडे  विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आणि प्रभाग क्रं 4 मधून विक्रमी अशी 2245 मतांची आघाडी मिळाल्याबद्दल संपूर्ण प्रभागात अंबेवेस,धोकटे गल्ली, गोडाळे गल्ली,देशमुख गल्ली, जंगम गल्ली, जगतकर गल्ली,प्रबुद्ध नगर, ईस्लामपुरा बंगला, गणेशपार परिसरात प्रत्येक घरोघर आभार फेरीच्या माध्यमातून जावून पेढे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
       या आभार फेरीत माजी नगराध्यक्ष व या प्रभागाचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या  धर्माधिकारी, सौ. कमलबाई कुकर,   वैजनाथ सोळंके, प्रा.डॉ.विनोद जगतकर  यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment