तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Saturday, 2 November 2019

परळीत डेंगुचे थैमान तापीच्या रग्णांनी हॉस्पिटल भरली


परळी(प्रतिनिधी)
परळी शहरात डेंगुने थैमान घातले असुन ताप व रक्तातील पेशा कमी होण्याने खाजगी दवाखाने खचाखच भरली आहेत.उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपजिल्हा रुग्णालयात असंख्य रुग्ण तापीचे असुन यापैकी दोघांना डेंगुची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे तर वेगवेगळ्या  खाजगी दवाखान्यात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत दोन दिवसांपूर्वी भिमनगर भागातील आनंद रोडे या युवकाचा डेंगुमुळे मृत्यु झाला आहे.या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे.

    मागील अनेक दिवसापासून शहरातील अनेक भागात तापाची लागन झालेले  रुग्ण दाखल होत आहेत सध्या परळी उपजिल्हा रुग्णालयात 23 रुग्ण तापीचे असुन यापैकी  सय्यद सिफा रा.पेठ मोहल्ला व रेहान बागवान रा.इंदिरा नगर, या दोन्ही रुग्णांना डेंगुची लागन झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.एकट्या कराड हॉस्पिटल मध्ये डेंग्युच्या सहा रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.शहरातील आनंद हॉस्पीटल,समर्थ हॉस्पिटल,मुंढे बालरुग्णालय,जाजु हॉस्पीटल अशा अनेक खाजगी दवाखान्यामध्ये 45 ते 50 डेंग्युची लागन झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे.शहरातील अनेक भागात घाण साचलेली आहे यातच मागील दहा दिवसापासुन सुरु असलेल्या परतीच्या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंगु व मलेरिया चा फैलाव होत आहे. न.प.कर्मचारी आणखीही निवडणुकीच्या वातावरणातुन बाहेर पडलेले नसल्याने शहराची स्वच्छता मंदगतीने होत आहे.डासांचा फैलाव होवु नये म्हणुन करण्यात येणारी फवारणी  झालेली नसल्याने डेंगु,मलेरिया व तापीची साथ पसरली आहे. 
उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार 
 तापीची लागन झालेले रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत.परंतु या रुग्णालयातील अनेक विभाग बंद आहेत.डेंगुच्या या रुग्णांना डेंग्युची तपासणी करणारी यंत्रणा परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात नसल्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी करावी लागत आहे.खाजगी डॉक्टरांकडून या तपासणीसाठी 400 ते 450 रु.आकारले जात आहेत.उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणीची यंत्रणा नसल्याने व वैद्यकिय अधिक्षक डॉ.रामेश्वर लटपटे यांचा रुग्णालयातील कर्मचार्यावर अंकुश नसल्याने व त्यांना आपल्या खाजगी रुग्णालयातच अधिक रस असल्याने सरकारी रुग्णांना आर्थिक भुर्द॔ड सोसावा लागत आहे.

No comments:

Post a Comment