तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 21 November 2019

आ बाबाजानी दुर्रानी यांना मंत्री पद मिळावं;कार्यकर्त्यांच्या साेशल मिडियातून व्यक्त होताहेत भावना.
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षानी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापने साठी आता केवळ आैपचारीकता बाकी राहिलेली असतांना खा पवारांचे एकनिष्ठ असलेले विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रांनी यांची मंत्री पदी वर्णी लागावी अशी भावना आता पाथरी तालुक्यातूनच नव्हे तर सबंध परभणी जिल्ह्यातून त्यांचे समर्थक साेशल मिडियातून मागिल काही दिवसा पासून व्यक्त करत आहेत.

आ बाबाजानी दुर्रानी हे विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे सबंध जिल्हाभराने पाहिलं आहे आणि अनुभवलं ही आहे. मागिल दहा पंधरा वर्षात या नेतृत्वाने पाथरी शहर आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम केलं आहे.विकास कामात खाेडा न घालने हा या नेतृत्वाचा अंगभूत  गुण सर्व परिचित आहे. राष्ट्रीय महामार्गांची कामे असाेत की विराेधी पक्षातील नेत्यांची विकास कामे असाे यात आ दुर्रांनी हे कधीच अडथळा ठरले नाहीत किंवा त्यांनी कधी अडथळा येऊ दिला नाही ही त्यांची नेहमीच खासियत राहिली आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांना मात्र विराेधकांनी अनेकवेळा अडसर आणला पण आ दुर्रानी या विषयी शासन प्रशासन स्तराव रितसर लढाई जिंकत पुढे वाटचाल केली.रेल्वे मार्गा साठी जमिन अधिग्रहनाला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दिला असतांना महाराष्ट्र शासनाने त्यांचा अर्धा वाटा भरण्याचे पत्र दिले नाही. तसेच साईबाबा जन्मस्थान मंदिराच्या कृती विकास आराखड्याचे जवळपास शंभर काेटी रुपये मागच्या शासनाने मंजूरी मिळून सुद्धा दिले नाहित. का तर आ दुर्रानी हे विराेधी पक्षाचे आमदार आहेत म्हणून. हा पाथरी तालुक्या सह जिल्ह्यावर अन्याय असल्याच्या भावना सर्व स्तरातून एैकायला मिळतात. त्या मुळे आता सत्ता आल्यास मराठवाड्याला एक कार्यक्षम मंत्री मिळावा ही भावना आता सबंध जिल्हाभरातून व्यक्त हाेत आहे.महा विकास आघाडीत आता जिल्ह्यातील तीन ही पक्षाचे आमदार असणार आहेत शिवसेनेचे परभणीचे आ राहूल पाटील, पाथरीचे काँग्रेस आ सुरेशराव वरपुडकर आणि पाथरीचे रहिवाशी असलेले विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ बाबाजानी दुर्रानी या तिघांना ही आपापल्या पक्षां कडून मंत्री पद मिळाव अशी भावना परभणी जिल्हावाशिय व्यक्त करत आहेत. आ दुर्रानी यांचा राजकारणातील चाळीस वर्षाचा प्रदिर्घ अनुभव नक्कीच जिल्ह्याच्या विकासा साठी अनुभवी येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जाळं परभणी जिल्ह्यात निर्माण करण्यात आ दुर्रानी यांचा माेलाचा वाटा राहिलेला आहे.गावागावात कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण करून जवळ पास ग्रामपंचायत, साेसायटी पासुन जिल्हापरिषदे पर्यंत त्यांनी एकहाती सत्ता स्थापण केलेली आहे. महिणा भरा पुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार आ सुरेश वरपुडकरांच्या विजयात त्यांचाच सिंहाचा वाटा राहिला आहे. आ वरपुडकर जेवढ्या मतांनी निवडून आले तेवढे मताधिक्य आ बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी शहरातूनच दिले आहे. विसाच्या दृष्टी बराेबरच कार्यकर्त्यांची काळजी घेणारे हे नेतृत्व आता राज्याच्या गतिमान विकासा साठी मंत्रिमंडळात असावं ज्या मुळे राज्याच्या विकाला तर गती मिळेलच परंतू मराठवाडा आणि परभणी जिल्ह्या सह पाथरी तालुक्याचा गतिमान विकास हाेईल अशी भावना सर्व स्तरातून साेशल मिडिया आणि जाहिर पणे व्यक्त हाेतांना दिसत आहे. तीन पक्षांचे सरकार बनत असल्याने मंत्री पदे विभागून जाणार आहेत. अशात खा पवार साहेब या गुणी नेत्याला संधी देऊन नक्कीच न्याय देतील अशी भावना व्यक्त हाेत आहे.

No comments:

Post a comment