तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ  30 नोव्हेंबर 2019 अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 7:  डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास यापूर्वी 31 ऑगस्ट 2019 मुदत होती. सदर मुदत वाढविण्यात आली असून 11.10.2013 च्या शासन निर्णयातील विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत मागविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सदर योजनेतंर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या निवासी मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a comment