तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

सेनगाव तालुक्यातील सुकळी (खु) येथे शेतक~यावर वाघाचा प्राणघातक हल्ला
(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)

सेनगाव/प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील सुकळी (खु) येथे दि.02 नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी दोन च्या सुमारास वाघाने अचानक पणे हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सेनगाव तालुक्यातील सुकळी (खु) येथील शेतकरी संतोष श्रीराम कबाडे (वय 28) यांचे गावापासुन एक कि.मी.अंतरावर वाघाई पाट शिवारात शेत असुन ते आपल्या शेतातील बांधावरील धु~यावरील गवत कापत होते.जवळच शेळ्या चारणारे भगवान सिरसाठ यांच्याशी गप्पा मारत होते तर रमेश आठवले हे शेतमजुर मालकाच्या शेतातुन गावाकडे निघाल्याने ते ही तिथे गप्पा मारत उभे होते.याच दरम्यान पाटात दडी धरून बसलेल्या वाघाने अचानक पणे संतोष कबाडे यांच्यावर पाठीमागुन हल्ला केल्याने कबाडे यांच्या खांद्याला व पाठीला वाघाचा पंजा लागल्याने रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.यानंतर त्या तिघांनी ही आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी मदतीला धावून आल्याने वाघाने तेथुन पळ काढला.त्यानंतर उपस्थित  शेतक~यांनी गंभीर जखमी असलेल्या कबाडे यांना उपचारासाठी सेनगाव येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले.येथील डाॅ. कव्हर यांनी प्राथमिक उपचार करीत हिंगोली येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने कबाडे यांना हिंगोलीला रवाना करण्यात आले आहे. हि घटना गावाजवळच घडल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळी वन अधिकारी केशव वाबळे,वन परीक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक व कर्मचा~यांनी भेट दिली.शिवसेनेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख व सेनगावचे उपनगराध्यक्ष प्रविण महाजन यांनी देखील शिवसैनिकासह सुकळी (खु) गावात जाऊन नागरीकांनी घाबरू नये असे आवाहन करीत चर्चा केली.

No comments:

Post a Comment