तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

पाथरी तालुक्यात शेतक-यांचा कल उस लागवडी कडे

प्रतिनिधी
पाथरी:-सलगच्या दुष्काळा नंतर तालुक्यात या वर्षी प्रथमच माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात झालेली असल्याने तालुक्यातील शेतकरी आता बारमाही पीक म्हणून ओळख असलेल्या उस पीका कडे वळत असुन काही ठिकाणी लागवडीची लगबग पहावयास मिळत आहे.
या वर्षी सुरूवातीला रुसलेला वरून राजा परतीच्या वेळी मनसाेक्त बरसला या वेळी अती पाऊस झाल्याने खरीपाची हाताशी आलेली पीके गेली,तर रब्बी ज्वारीची दुबार पेरणी  करावी लागली. पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने असल्याने आणि या वर्षी जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असून गाेदावरी नदी वरील ढालेगाव, सावंगी, आणि मुदगल येथील उच्च पातळी बंधारे तुडूंब भरलेले आहेत.त्यातच चांगला पाऊस झाल्याने विहिरी आणि कुपनलीकांची पाणी पातळी प्रचंड वाढली असल्याने उस पिकाला पाणी कमी पडणार नाही असे सांगितले जात आहे. त्या मुळे ज्या शेतक-यांची अर्थीक  परिस्थिती चांगली आहे असे शेतकरी शेत वाफस्यावर आल्या मुळे आता त्या शेतात उसाची लागवड करण्या साठीची लगबग करतांना दिसून येत आहेत. 

उसा साठी माेठा खर्च

उस या पिका साठी बेने तीन ते चार हजार रुपये प्रती टन मिळत असून एका एकरात किमान चार टन बेने लागते तसेच लागवडी साठी मजूर एका एकर ला चार हजार रुपये घेत आहेत तर सुरूवातीला खता साठी तीन हजार रुपये आणि शेत मशागती साठी एका एक्कर ला नांगरणी,रोटाव्हेटर, सरी असा साधारणत: तीन हजार रुपये खर्च असा लागवडी साठी प्रती एकरी २६ हजार रुपये खर्च हाेत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या नंतर खुरपणी आणि खत वेगळे. ज्यांच्या कडे उस बेणे उपलब्ध आहे असे शेतकरी क्षेत्र वाढऊन लागवड करत आहेत मात्र खरीप हातचा गेलेले शेतकरी लागवड खर्च झेपत नसल्याने कमी क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करतांना दिसत आहेत. गाेदावरी नदी पट्टयात उसाची लागवड अधिक प्रमाणात हाेत असून. या वर्षी पाऊस ऑक्टोबर अखेर पर्यंत पडत राहिल्याने गत वर्षी काही प्रमाणात राहिलेल्या उसाला त्याचा माेठा फायदा झाला. मात्र अजून ही काही क्षेत्रात वाफसा नसल्याने शेत मशागत करता येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

No comments:

Post a comment