तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

रस्त्यांचे कामे सुरू न करणाऱ्या एजन्सीवर कारवाई - आ. पवारसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ६ _ गेली काही महिन्यांपूर्वी शुभारंभ केलेल्या रस्त्यांची काम सुरू करण्यासाठी सतत संबंधीत एजन्सीला सुचना केली परंतु अनेक ठिकाणी कामे सुरू झाली नाहीत. शुभारंभ झालेले सर्व रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा नसता काम सुरू न करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करणार असल्याचे आ. लक्ष्मणराव पवार यांनी सांगितले.
      गेली पाच वर्षात आपण गेवराई विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला जाण्यासाठी दळण वळणांचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे गेली काही महिन्यापूर्वी ताकडगाव रोड तसेच गेवराई ते शेवगाव रस्त्यावरील उमापूर ते चकलंबा येथील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला होता परंतू गुत्तेदाराच्या हालगर्जीपणामुळे येथील काम सुरू करण्यासाठी उशीर झाला आहे. आपण स्वतः अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलो आहोत. यावेळी गुत्तेदाराला तात्काळ रस्त्यांचे कामे सुरू करण्याची कडक सुचना दिली आहे. तीन दिवसात सदरील रस्त्यांवरचे खड्डे बुजवुन देण्याचे आश्वासन गुत्तेदाराने दिले असल्याचे आ. लक्ष्मणराव पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेवराई ते शेवगाव रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले आहेत काही महिन्यांपूर्वी उमापूर येथील रस्ता कामांचा शुभारंभ होऊनही गुत्तेदारांच्या हालगर्जीपणामुळे तेथील काम सुरू झाले नाही याची तक्रार चकलंबा, उमापूर येथील ग्रामस्थांनी केली होती, त्या अनुषंगाने दि. ६ रोजी आ. पवार यांनी सा.बांं.विभागाचे कार्यकारी अभियंता सानप व उपअभियंता वागज यांना सोबत घेऊन गेवराई ते शेवगाव रस्त्यांवरील उमापूर ते चकलंबा येथील रस्त्यांची पहाणी केली.
        यावेळी विठ्ठल मोटे, उध्दव मडके, विष्णूपंत घोंंगडे, प्रल्हाद येळापूरे, सुधीर औटी आदि उपस्थित होते. गेवराई विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आ. लक्ष्मण पवार यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून दिल्याने गेवराईच्या विकासाला चालना देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment