तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

केकतउमरा येथे गुंजला भारतीय संविधानाचा नारा नेहरू युवा संस्थेचा पुढाकार
फुलचंद भगत
 वाशिम-सामाजिक,शासकीय, निमशासकीय उपक्रमात सतत कार्यरत असलेली राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक शिक्षण, प्रसारक बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमराच्या वतीने 70 वा भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला आहे.यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने संपुर्ण गावातून भारतीय संविधान रैली काढण्यात आली.यावेळी विविध भारतीय संविधानाच्या घोषणा देऊन संपर्ण गावं दणाणून गेले.यावेळी नेहरू युवाकेंद्र वाशिम तालुका समनव्यक प्रदीप पट्टेबहादूर यांनी उपस्थितां समवेत प्रास्ताविकेचे वाचन केले आहे.हा सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर,नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामलक्ष्मण वाणी,विठाबाई पसारकरशाळेच्या मुख्याध्यापिका सौ हर्षा पसारकर व सर्व शिक्षक या रॅलीत सहभागी झाले होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a comment