तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 November 2019

पंकजाताई मुंडेंनी सत्ताकाळात राबवलेल्या योजनांमुळे बीड जिल्ह्यावर असलेला ‘स्त्रीभ्रूण’ हत्येचा कलंक पुसला गेला

प्रतिनिधी
) :- दि. १८ – एकेकाळी राज्यात स्त्रीभ्रूण हत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जाणा-या बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हा राज्यात सगळ्यात कमी होता.मात्र,आता मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.बीड जिल्हा हा आता राज्यातील मुलींच्या जन्मदरामध्ये अग्रस्थानी जिल्ह्यांमध्ये जाऊन बसला आहे, हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आता बीड जिल्ह्यात एक हजार  मुलांमागे तब्बल ९६१ मुली आहेत.

२०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर बीड जिल्हयाला  पंकजाताई मुंडे यांच्या रूपाने महिला नेतृत्वास मंत्रीपद मिळाले, त्यात महिला व बालकल्याण खाते त्यांना मिळाल्याने बीड जिल्हयात त्यांनी महिला सक्षमीकरण आणि स्त्रीभ्रुण हत्येबाबत कठोर पाऊले उचलली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ अशा विविध योजना राज्यासह जिल्हाभरात राबवल्या.त्यामुळे मुलींच्या  जन्माचं संरक्षण होऊ लागले आणि त्याचा परिमाण आता वाढलेल्या मुलींच्या जन्मदराच्या रूपाने दिसू लागला आहे.
याच सोबत जिल्हयातील आरोग्य यंत्रणा, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे समाजात जनजागृती निर्माण झाली.  ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यांमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत होऊ लागले आणि त्यामुळे बीड जिल्हयाला लागलेला  स्त्रीभ्रूण हत्येचा लागलेला कलंक पुसून काढला गेला.

कसा वाढला मुलींचा जन्मदर?

सन 2010 – 2011 मध्ये 1000 मुलामागे फक्त 810 मुली,
सन 2015 – 2016 मध्ये 1000 मुलामागे  898 मुली,
सन 2016 – 2017 मध्ये 1000 मुलामागे  927 मुली,
सन 2017 – 2018 मध्ये 1000 मुलामागे 936 मुली,
सन 2018 – 2019 मध्ये 1000 मुलामागे तब्बल 961 मुली

No comments:

Post a Comment