तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

मुंडे भगिनींच्या पाठपुराव्याचे फलित, परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाला मिळाले आयएसओ मानांकनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २० ---- बीड जिल्हयातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या परळी   वैजनाथ रेल्वे स्थानकास दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर गजानन मल्या यांच्या हस्ते आयएसओ 14001:2015 हे मानांकन देण्यात आले आहे.दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर गजानन मल्या यांनी मंगळवारी सकाळी परळी रेल्वे स्थानकास भेट देऊन पाहणी केली.

  यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना परळी रेल्वे स्थानकात सीसीटीव्हीसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच,परळी रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना बोगी वाढवून देऊ अशी माहिती देण्यात आली.मल्यांच्या या दौऱ्यानिमीत्त परळी रेल्वे स्थानकावर आकर्षक सजावट करून रंग देत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तसेच देवदेवतांची चित्रे रेखाटली होती.

मुंडे भगिनींच्या प्रयत्नांचे फलित 
-----------------------------
गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या खासदार डाॅ.प्रीतमताई मुंडे व पंकजाताई  मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित असल्याची भावना परळीकरांकडून व्यक्त होत आहे.परळी रेल्वे स्थानकाचा समावेश रेल्वेच्या पर्यटन मंडळात करण्यासाठी ही खा.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.तसेच,यासंबंधी खा.मुंडे यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान मागणी सुद्धा केली होती.

No comments:

Post a comment