तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 November 2019

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त डोणगाव मध्ये निघाली भव्य मिरवणूक
डोणगाव :-
शेकडो मुस्लिम भाविकांचा सहभाग: विविधरंगी पगडी व हिरव्या ध्वजाने वेधले लक्ष .
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शहरातून 10 नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो मुस्लिम भाविक सहभागी झाले होते. विविधरंगी पगडी , पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. 
जुलूस-ए-मोहंमदी अर्थात मिरवणूकीला रविवारीवारी सकाळी ८.३० वाजता स्थानिक गरीब नवाज मस्जिद येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली. मिरवणूकीत सजविलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा देणारे फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी सहभागी होते. डोक्यावर विविधरंगी पगडी अन् अंगात पांढरे वस्त्र अशा पारंपरिक वेशात मुस्लिम बांधवांनी रहेमत नगर, मेन रोड , आरेगाव फाटा, इंदिरा नगर , वाय टी चौक, जनरल स्टोअर्स लाईन, सावजी गल्ली , शेलगाव पार  , जामा मस्जिद चौक,  माळी वेटाळ,पंचशील नगर, त्रिगोंनी चौक, मेन हाय वे रोड , या मार्गाने शिस्तबद्ध मिरवणूक काढली.  व गरीब नवाज मस्जिद येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत शहरातील विविध भागातील मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. 
ईद-ए-मिलादुन्नबी  निमित्त मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये  पताके, झेंडे लावून सजावट सुद्धा करण्यात आली होती. तसेच मिरवणूकीमध्ये सहभागी भाविकांसाठी सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकत्यांकडून अल्पोपहार व थंडपाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणूकीत  माजी सरपंच भाले खान भोलेखा खासाब ,अहेमद अली ,अब्दुल साबीर ,हमीद मूल्लाजी ,, अबरार खान जावेद खान  , सलीम भाई डिलर, आशिफ शहा, शेरु आली, शेख आरिफ, शकील पठाण, अनिसखान, शाहीदखान, सैय्यद फैजान, शेख साहील, शेख शाफिक शेख तैफीक इसराईल खान अतिक खान सिराज अली , अकबर अली ,सलीम खान , शब्बीर मॅकेनिकल, सोहील रब्बानी 
यांच्या सह मुस्लिम बांधव  व बालके मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम करण्यासाठी  शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिपक पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment