तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितित स्टेट बँक भारतीय स्टेट बँक, एक्सपाे मेळावा संपन्न

परभणी:-क्षेत्रीय कार्यालय, परभणी द्वारा दोन दिवसीय "स्टेट बँक एक्सपो" मेळावा दिनांक १८ व १९ नोव्हेंबर रोजी, आर आर पेट्रोल समोर, वसमत रोड परभणी ला आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
हा मेळावा एसबीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक हरे राम सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यात बँकेच्या संबंधित दैनंदिन व्यवहार तसेच गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, पेंशन कर्ज, कार लोण, डॉक्टर प्लस, व्यावसायिक कर्ज, कृषी गोल्ड लोन, कृषी तारण मालमत्ता कर्ज, या विषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
तसेच सर्व सामन्यां साठी जिव्हाळ्याचा विषय असलेले बचत खाते उघडणे, चालू खाते, पीपीएफ खाते, सुकन्या समृद्धी योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा योजना याबद्दल देखील लोकां मध्ये जागरूकता निर्माण केली.

गुंतवणूक साठी, एसबीआय लाइफ, एसबीआय म्युचअल फंड, एसबीआय डिमॅट खाते यावर माहिती देण्यात आली.
बँकेचे डिजिटल उत्पादने YONO बदल जागरूकता करून जास्तीत जास्त ग्राहकांनी डिजिटल प्रॉडक्ट चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले. या वेळी बालगोपालां साठी मॅजिक शो, पपेट शो, संगीत शो,मोफत बलून असे मनोरंजन पर कार्यक्रम घेण्यात आले. या बरोबरच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाची बचत गटाच्या महिलांनी व्यवस्था केली.

दुसर्‍या दिवशी सकाळी सर्व कर्मचारी जवळच असलेल्या रायपुर या गावी गेले आणि तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप केले. याच शाळेतील मुलीचे कर्मचा-यांनी सुकन्या समृद्धी योजनेत अंतर्गत फॉर्म भरून घेतले आणि समाजिक दायित्व म्हणुन पहिला हप्ता सर्व अधिकारी, कर्मचारी मिळून भरला. 

दुपारी जिल्हा परिषदेचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते, भारतीय स्टेट बँक, औरंगाबाद चे विभागीय उप महा प्रबंधक,श्री रवी वर्मा यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ३१७ बचत गटांना कर्ज मंजुरी चे पत्र देण्यात आले.

परभणी करांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला..
या मेळाव्याच्या यशस्वीते साठी मागील सात,आठ दिवसा पासुन एसबीआय चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मेहनत घेतली. अश्या प्रकारच्या मेळावा घेण्याची परभणीत ही पाहिलीच वेळ असली तरी ते कर्मचा-यां साठी आव्हान हाेते ते त्यांनी समर्थपणे पूर्णत्वास नेले आहे.  याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपण सर्वाच्या सहकार्याने, प्रतिसादाने आम्हाला असे उपक्रम हाती घेण्यास प्रेरणा मिळते. अशी प्रतिक्रिया कर्मचा-यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a comment