तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

परळीचा पाणीप्रश्न मिटला वाण मथ्ये वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा ; योग्य नियोजन करुन परळीकरांना पाणी पुरवठा करु-सौ.प्राजक्ता कराडहादेव गित्ते.
---------------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
  परळी शहरासह 16 गावांची तहान भागविणार्या नागापुर येथील वाण प्रकल्पात मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे 35% पाणीसाठा झाला असुन पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढे पाणी उपलब्ध झाल्याने तब्बल सह महिन्यानंतर परळीकरांना नळाचे पाणी उपलब्ध झाले आहे.वाण मध्ये पाणी उपलब्ध झाल्याने परळी करांना पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपुरवठा करणार असल्याचे न.प.पाणीपुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भावड्या कराड यांनी दिली.
  परळीसह 15 गावांचा पाणीपुरवठा व मोठ्या प्रमाणावर सिंचन असलेल्या नागापुर येथील वाण प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून परळी शहराचा पाणीपुरवठा बंद आहे.संपुर्ण पावसाळा संपला तरी वाण प्रकल्पात पाणी आले नव्हते परंतु परतीच्या पावसाने मागील चार दिवसापासुन जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठा वाढुन धरणाची पाणीपातळी 15 फुट झाली आहे सध्या पाणीपातळी 35%असुन या पाणीसाठ्यातुन परळीशहरासह,मांडेखेल,माळहिवरा,बेलंबा,तडोळी,वडखेल,मलनाथपूर,भिलेगाव,नागापुर,दौनापूर,डाबी,दौनापूर आदी 15 गावांना पुढील सहा महिने पाणी पुरवठा होवु शकतो.
 परळी तालुक्यात चांगला  पाऊस सुरू  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे कारण  परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. 
   @@@@@
 परळीला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध

कोरड्या पडलेल्या वाण प्रकल्पात सध्या 35%पाणीसाठा उपलब्ध झाला असुन तो पुढील वर्षभर पुरु शकतो.यामुळे परळीकरांना दिवाळीच्या सणात पाणी उपलब्ध झाले आहे.सध्या शहरातील पाणीवाटपाचे नियोजन सुरु असुन भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर खडका येथील बंधार्यातुन तात्काळ पाणी घेता यावे याची न.प.च्या माध्यमातून तयारी करण्यात येत आहे मागील सहा महिन्यापासून पाणी पुरवठा बंद असल्याने अनेक ठिकाणी नादुरुस्त झालेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली असुन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.
  -सौ. प्राजक्ता भावड्या कराड
पाणीपुरवठा सभापती,न.प.परळी

No comments:

Post a Comment