तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

परळीत राखेच्या वाहतुकींने घेतला एकाचा बळी तर दोघे जखमीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदीर येथील एक लग्न आटपुन परळी शहरात येत असलेल्या मोटार सायकल स्वारास राखेच्या भरधाव टँकरने धडक दिल्याने एक ठार तर दोन जख्मी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.दरम्यान परळी शहरातुन दररोज 24 तास शेकडो वाहनातुन राखेची वाहतुक होते यावर पोलिस प्रशासन ना वाहतुक नियंञक लक्ष देतात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहिती अशी आहे कि, नंदागौळ येथील एक लग्न टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदीर येथे होते.लग्न संपवुन नंदागौळ येथील रहिवासी असलेले शिवराज सतु गित्ते शिवाजी बाबुराव गिते नितीन पंढरी गीते हे आपल्या मोटार सायकल (क्र.एम.एच-24-6741) घेऊन परळीकडे निघाले होते थर्मल जवळील पुलावर आले असता समोरुन राखेचे टँकर एम.एच-44-7495 भरधाव वेगात येऊन धडक झाली असुन यात मोटार सायकलस्वार शिवराज सतु गित्ते ठार तर शिवाजी बाबुराव गिते,नितीन पंढरी गीते हे दोघे गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a comment