तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा माजी अध्यक्ष कै नारायणराव चन्नावार यांना परभणी जिल्हा महासभेची भावपुर्ण श्रद्धांजली


    
जिंतूर      
           विविध क्षेत्रात आपल्या कर्तत्वांने राज्यात नावलौकिक असलेले नांदेड येथील आर्यवैश्य समाजातील ९७ वर्षाचे ज्येष्ठ समाजसेवक नारायणराव पांडुरंग चन्नावार ह्यांच२५ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता नांदेड येथे वृद्धापकाळान निधन झालं.
त्यांच्या पश्चात मुलगा संतोष चन्नावार सुनबाई सौ शैलजा,दोन नातू ,चार नातीआणि जावई,पतवंडेआदी मोठा परिवार आहे. महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा चे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी संभाळली नांदेड मर्चंट बँक ,नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय ,नांदेड क्लॉथ मर्चंटस असोसिएशन,श्री नगरेश्वर वैश्य मंदिर,दत्तनगर सम्राटनगर नांदेड टाऊन मार्केट ,फेडरेशन ऑफ मर्चंटस असोसिएशन अश्या अनेक संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.या सह महाराष्ट्र माथाडी महासंघाचे संचालक आणि ग्राहक मंचाचे सदस्य ,होमगार्ड समादेशक म्हणून देखील त्यांची कारकीर्द स्मरणात राहणार आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच महासभा पदाधिकारी सदस्य यांच्यावर दुःखा ची छाया पसरली
परभणी जिल्हा महासभेच्या पदाधिकारी यांनी एक बैठक घेऊन भावपूर्ण शब्दसुमनांजली वाहली. राज्यातील एक ज्येष्ठ समाजसेवक अनंतात विलीन झाल्याने ही पोकळी भरून येणे अशक्य असलं तरी त्यांच्या शिकवणी नुसार मार्गक्रमण करण्यात जीवनात यशाची हमी  मिळणार असल्याची भावना  महासभेचे प्रसिद्धी प्रमुख प्रदिप कोकडवार यांनी व्यक्त केली या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन वट्टमवार
बालाजी डुब्बेवार(सचिव), सुहास कोकडवार(कोषाध्यक्ष), प्रभाकर रेवनवार,बिपिन पेकम, श्रीराम रुद्रवार, नारायण रेवनवार,
श्रिनिवास रूद्रवार,राम रूद्रवार,
निखील तारे ऊपस्थीत होते.

No comments:

Post a comment