तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

पाथरीत पीक कर्जा साठी बँक व्यवस्थापकाला शेतक-यांचा घेराआे; कार्यालयातच ठिय्या आंदाेलनप्रतिनिधी
पाथरी:-शहराती बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत शेतक-यांनी पीक कर्जा साठी बँक व्यवस्थापकाच्या केबीन मध्ये जात घेराआे घालत ठिय्या आंदाेलन सुरू केले आहे.
या बँक शाखे कडे कान्सूर, बाभळगाव, लाेणी बु. अंधापूरी, टाकळगव्हाण, टाकळगव्हाण तांडा, तारूगव्हाण, डाकू पिंप्री हे सात गावे दत्तक आहेत. या गावातील शेकडाे शेतक-यांनी खरीपा साठी कर्ज मिळावे म्हणून जुलै महीण्यात माेठी कसरत करत कागदपत्रां साठी माेठा खर्च करून कागदपत्रे जमा करून दिली. ही कागदपत्रे बँकेच्या वतीने वरीष्ठ कार्यालयात पाठवण्यात आली. त्या नंतर यात ज्या त्रुटी हाेत्या त्या गत महिण्यात देण्याचे बँक व्यवस्थापकांनी शेतक-यांना सांगितले शेतकरी १९ ऑक्टाेबर राेजी पासून त्रुटीची कागदपत्रे घेऊन बँकेत आले मात्र व्यवस्थापक शिंदे हे निवडणुक कार्या साठी गेल्याने बँकेतील कर्मचा-यांनी ही कागदपत्रे घेण्यास नकार दिला असे शेतकरी सांगत आहेत. आता कर्ज मिळेल पण रब्बी हंगामा साठी असे बँक व्यवस्थापक सांगत असल्याने हे कर्ज तुटपूंजे मिळणार असल्याने शेतकरी खरीपा साठीची फाईल घेऊन रब्बी साठी दहा-विस हजार घेऊन आमचा फायलीचा खर्च ही निघत नसल्याचे सांगत आहेत.त्यात पुन्हा पुनरगठनाच्या फाईल असल्याने आम्हाला खरीपाचेच कर्ज द्या या वर वरील गावचे शेतकरी अडून बसले असून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाच्या दालनात ठिय्या मांडून बसले असून या मुळे बँकेच्या कामकाजावर परीणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

रब्बी कर्ज देण्या शिवाय पर्याय नाही-शिंदे

शेतक-यांनी खरीपा साठी फाईली दिल्या असल्याची कबूली बँक व्यवस्थापक शिंदे यांनी देत आपण त्रुटी देण्या साठी सांगितले हाेते. या काळात निवडणूक कर्तव्यावर गेलाे हाेताे . या विषयी वरीष्ठांशी चर्चा केली मात्र आता रब्बी साठी या शेतक-यांना कर्ज देऊन परत मार्च एप्रिल मध्ये पुर्ववत खरीपाचे कर्ज या शेतक-यांना देऊ असे या बँकेचे व्यवस्थापक शिंदे म्हणाले.

दरम्यान शेतकरी कर्जा विषयी काही एक एैकन्याच्या मानसिकतेत नसून अतिवृष्टीने सर्व काही गेले. आता खाजगी कर्ज आणि घरगाडा कसा चालवावा असे सांगत बँकेत ठान मांडून बसले आहेत

No comments:

Post a comment