तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

तालुका विकास संघर्ष पत्रकार संघअध्यक्षपदी डॉ.गोतमारे तर सचिवपदी डॉ संतोष लांडे यांची निवड

[ प्रतिनिधी] येथील डॉ.माळपांडे हॉलमध्ये  दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधुन पत्रकारांची बैठक आयोजीत करण्यात आली होती . सर्वप्रथम भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला. उपस्थीतांनी पत्रकार बांधवांनी संविधान वर आपले विचार व्यकत करुन डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे गुण अंगिकारण्याचे आव्हाण केले महामानव डॉ बाबा साहेबांना सामुहिक अभिवादन करण्यात आले तसेच २६-११ रोजी मुंबई येथे अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  या बैठकीमध्ये तालुका विकास संघर्ष समिती पत्रकार संघ  पदाधिकारी यांचेनिवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षडॉ.सहदेवराव गोतमारे तर सचिवपदी डॉ.संतोष लांडे कार्याध्यक्ष पदी रामेश्वर गायकी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . तर   कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष आनंद खंडेराव, सहसचिव दयालसिंग चव्हाण,कोषाध्यक्ष नंदकिशोर शिरसोले,संघटक शेख अब्दुल,प्रसिध्दी प्रमुख अब्दुल युसुफ,अनिलसिंग चव्हाण, सदस्य़ सागर कापसे, अझहर अली, भगवान पाखरे, सतिष वानखडे,शाम वाघ,नारायण सावतकार,नंदुभाऊ चिकटे, राजेद्र ससाने, भास्कर बोद्रे ,शेक अनिस,आकाश पालिवाल,रमेश लहासे,राहुल मनसुटे ,उदेभान दांडगे,गोपाळ कुलकर्णी,प्रभू पारस्कार या सर्व सदस्यांची  संग्रामपूर तालुका विकास संघर्ष समिती पत्रकार संघ   कार्यकरनी गठीत करण्यात आली आहे.अध्यक्ष  डॉ.सहदेवराव गोतमारे ,तर सचिव डॉ.संतोष लांडे  यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ़ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर नवनिर्वाचित पत्रकार यांनी मार्गदर्शन केले तर येत्या वर्षात विकास संघर्ष पत्रकार संघच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याविषयी सर्वानुमते ठराव घेण्यात आले आहे.

No comments:

Post a comment