तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

परळी शहरातील डासांची विल्हेवाट लावून प्रभाग क्र ५ मध्ये तात्काळ पाणी पुरवठा करा - व्यंकटेश शिंदेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भयंकर दुष्काळा चा सामना करत शहरातील नागरिकांनी अनेक महिने पाण्यासाठी तडफडताना भटकंती करत त्रास सहन केला. तर आता पाऊस पडूनही पाणी असूनही पुरवठा का होत नाही तो तात्काळ करावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगर परिषदे कडे केली आहे.

 परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पुर्णतः कोरड्या पडलेल्या नागपूर येथील वाण धरणात मागील दिवसात झालेल्या पावसा मुळे शहराला पूरक असा पाणीसाठा झाला असूनही तरीही प्रभाग क्र ५ मध्ये नागरिकांसाठी पाणीपुरवठा होत नाही तसेच नरहरी महाराज मंदिर परिसरात अध्याप नळांच्या पाईपांची जोडणी करण्यात आली नाही त्यामुळे परिसरातील जनतेची तारांबळ होत असलेली बाब लक्षात घेत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून तात्काळ पाणी पुरवठा करा अशी मागणी करून स्वच्छतेच्या बाबतीत व डासांच्या वाढलेल्या  प्रमानामुळे वाढती रोगराई त्यावर अंकुश लावण्यासाठी लवकरात लवकर उपाय करण्याचीही त्यांनी मागणी केली त्यावेळी त्यांच्या समवेत उपशहर प्रमुख मोहन राजमाने, दीपक शिंदे युवा शहर समन्वयक सुदर्शन यादव, प्रदीप देशमुख, अजय आवड आदी सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment