तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 November 2019

दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गातच हाणामारी; एकाचा मृत्यू




दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण होऊन जबर मारहाण झाली.

वाशिम :-- २७
कारंजा नगर परिषदेअंतर्गत  मुलजी जेठा हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू असताना दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण होऊन जबर मारहाण झाली. त्यात एक विद्यार्थी बेशुद्ध झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

       याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या मुलजीजेठा न.प. मराठी हायस्कुलमध्ये बुधवारी सकाळी इयत्ता दहावीच्या वर्गखोलीत इंग्रजी विषयाची तासिका सुरू होती. याच दरम्यान दोन विद्यार्थ्यांमध्ये अचानक भांडण सुरू झाले. त्यातील एकाने तौफीक हसन पप्पूवाले (वय १६ वर्षे) रा.गवळीपूरा याचा गळा दाबल्याने तो बेशुद्ध झाला. ही बाब लक्षात येताच शाळेचे मुख्याध्यापक रमेश निशांतराव यांनी अन्य शिक्षकांच्या मदतीने तौफीकला तत्काळ उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र संबंधित रुग्णालयात कृत्रीम श्वासोश्वास (आॅक्सीजन) देण्याची व्यवस्था नसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच शाळेत व ग्रामीण रुग्णालयात मृतक विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तोबा गर्दी केली. या घटनेतील दोन्ही विद्यार्थी हे एकाच कुटूंबातील असल्याची माहिती असून इंग्रजी विषयाची तासीका सुरू असताना आणि वर्गशिक्षिका हजर असताना यासारखी घटना घडणे हे दुर्दैवी मानले जात आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस कारवाईची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.


 जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment