तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 November 2019

अभिनव विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादनपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-   ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  अभिनव विद्यालय येथे  संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व  संस्थेचे सचिव  परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसुर्य  महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र  अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास  अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड व प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मुंढे आणि संस्थेचे कार्यवाहक सूर्यकांत कातकडे व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून झाली त्यानंतर शाळेतील सहशिक्षक प्रकाश गीते यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल माहिती दिली जोतीराव गोविंदराव फुले हे क्रांतीसुर्य महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. 'शेतकऱ्यांचे आसूड' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता .बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते अशी माहिती सहशिक्षक प्रकाश गित्ते यांनी दिली या कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment