तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गेवराईच्या उमापूर परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाबीड (प्रतिनिधी) :- अवकाळी पावसामुळे जिल्ह्याभरात  सर्वच ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गेवराईच्या उमापूर परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना करून नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाला दिले.

तसेच सर्व शेतकरी बांधवांनी या संकटामुळे हताश होऊ नये, राज्य व केंद्र शासनासह आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत याठिकाणी खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a comment