तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा - प्रसाद देशमुखमहेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

रिसोड - ओला दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी द्या,  अशी मागणी संभाजी ब्रिगेड विध्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.परतीच्या पावसामुळे राज्यात २०१९-२० च्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीने बाधित शेतकरी कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी देण्यात यावी, अशी  मागणी आहे.  तसेच सदर शुल्क माफीसाठी आवश्यक निधी राज्य सरकारने वेळेवर शिक्षण मंडळास उपलब्ध करुन द्यावा, की जेणेकरुन परिक्षा शुल्क माफीची रक्कम योग्य वेळी त्यांच्या हातात पडेल. मात्र त्या दृष्टीने विद्यापीठामार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे,असेही नमूद करण्यात आले आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment