तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 November 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केली मुख्य सचिव अजय मेहता यांच्याशी चर्चा ; कनिष्ठ अभियंता पद भरती परीक्षेची तारीख बदलण्याची केली मागणी


(प्रतिनिधी) :-
जलसंपदा विभाग व बृहन्मुंबई महापालिकेतील कनिष्ठ  अभियंता पद भरती परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना एका परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.सदरील दोन्ही विभागात दोन वर्षानंतर पद भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून कनिष्ठ अभियंता पदासाठी तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व दोन्ही विभागातील कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात मुख्य सचिव अजय मेहता यांच्याशी चर्चा केली व कोणत्याही एका विभागाची परीक्षा अन्य तारखेला आयोजित करण्याची मागणी केली.खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मुख्य सचिव अजय मेहता यांनी दोन्ही विभागांशी बोलणी सुरू असून लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

1 comment: