तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

क्रांतीवीर लहुजी साळवे जयंती साठे चौक कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी के. डी. उपाडे, सचिव नाना कसबे तर कार्याध्यक्ष निलेश सगट    परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
    भारतीय स्वातंत्र्याचे आद्यजनक देशपिता क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या 225 व्या जयंती उत्सव साठे चौकातील कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे संस्थापक सदस्य के.डी. उपाडे यांची एक मताने निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून नाना कसबे, कार्याध्यक्ष निलेश सगट यांची निवड करण्यात आली.  संघटक म्हणून दशरथ आरगडे, विश्वनाथ पारधे, पी.पी. गायकांबळे, उध्दव मस्के, पवन कांबळे, मल्हारी मस्के तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी नगरसेवक रामचंद्र वाघमारे, यांची निवड करण्यात आली.

No comments:

Post a comment