तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

परळीतील कृष्णगोपाल तोतला जिल्हा न्यायाधिशपदीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
कृष्णगोपाल श्रीनिवासजी तोतला यांची नागपूर येथे जिल्हा न्यायाधिश म्हणून पदोन्नती झाली आहे. दि.०४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी राज्यभरातील विविध जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पारीत केले असून, त्याद्वारे त्यांना सन्मानाने त्या पदावर तात्काळ रूजू होण्याचे आदेशही दिले आहेत. कृष्णगोपाल श्रीनिवासजी तोतला हे नागपूर येथे मुख्य न्याय दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची या आदेशाद्वारे पदोन्नती घोषीत करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या क्रमांक १५ चे जिल्हा न्यायाधिश म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. कृष्णगोपाल तोतला हे परळी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त होत आहे.

No comments:

Post a comment