तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

वादळी पावसाने २२ गावे अंधारात.


डोणगाव, दि. 4
येथून जवळच असलेल्या लोणी गवळी, उमरा, भोसा, मोळा, मोळी परिसरात २ नोव्हेंबरला झालेल्या वादळी पावसाने लोणी गवळी विद्युत केंद्रासह २२ गावाची विद्यूत खंडीत झाल्याने गावकऱ्यांना पावसात अंधाराचा सामना करावा लागला. 
या परिसरात असणारे तीन पाझर तलावही तुडूंब भरल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेतामध्ये दोन फुट पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. अंजनी, उमरा शिवारात काच नदीच्या पात्रात समृध्दी महामार्गाचे काम चालू असल्याने नदीत खोदून टाकलेल्या मातीमुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतकऱ्यांचे नुकसान केले. समृध्दी महामार्गालगत शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या स्व्हिहस रोडवर पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने व स्थानिक ठेकेदाराने रोडच्या बाजूने नाल्या न केल्याने स्व्हिहस रोडवर पाणी साचून तलावाचे स्वरुप निर्माण झाले. शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. या परिसरात त्वरित सर्वे करुन समृध्दी रोडमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन त्वरित शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रमोद देशमुख, खरेदी विक्री संघाचे भागवत देशमुख यांनी केली आहे..
----------------------
लोणी गवळी विद्यूत केंद्रांतर्गत येत असलेल्या २२ गावांचा रात्री झालेल्या वादळी पावसामुळे विद्यूतचा संपर्क तुटला असून युध्द पातळीवर रात्रीच विद्यूतचे कामे सुरु असून दोन तीन
ठिकाणी झाडे व पोल पडले असून त्वरित विद्यूत पुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे..
ए. टी. मुळे,.
अभियंता महावितरण कंपनी
----------------

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment