तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

आ.धनंजय मुंडे यांचा अभूतपूर्व विजय म्हणजे सर्व जाती-धर्म घटकांचा सर्वांगिण विकासाचा दुरदृष्टीपणा- के.डी. उपाडे

 वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांनी गेली 24 वर्षे परळी विधान सभा मतदार संघातील जनतेच्या संपर्कात राहुन त्यांच्या आडी-अडचणी विविध जाती धर्मांच्या घटकांना न्याय, तरुणांना रोजगार, निराधारांना आधार, महिला बचत गटांना व पेन्शनरांना मोठे सहकार्य व विशेष म्हणजे उन्हळ्यात पाणी पुरविणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवून सेवा केली. आ. धनंजय मुंडे यांचा अभूतपूर्व विजय म्हणजे सर्व जाती-धर्म घटकांचा सर्वांगिण विकासाचा दुरदृष्टीपणा होय असे गौरवपूर्ण उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल परळीचे शहराध्यक्ष के.डी. उपाडे यांनी काढले.
    नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या बौठकीचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी आ. धनंजय मुंडे यांच्या विजयाचा अभिनंदन ठराव मांडतांना उपाडे बोलत होते. यावेळी बौठकीत पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी उपकस्थत कार्याध्यक्ष अशोक शेप, उपाध्यक्ष एस.के. गित्ते, सरचिटणीस वौजनाथ सावजी, प्रमुख संघटक रामकिशन माने, अरुण जोशी, डी.बी.     झाटे, डी.एम. मुगळीकर, ज्ञानेश्वर शिंदे, चंद्रकांत खके, दादाराव गायकवाड, एन.बी. सुरवसे इत्यादींचा शाल,पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. सुत्रसंचन अशोक शेप तर आभार वैजनाथ सावजी यांनी मानले.

No comments:

Post a comment