तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

शेतकर्‍यांनो धिर धरा पिक विमासह नुकसान भरपाई मिळणार शासन आपल्या सदैव पाठीशी : आ डॉ संजय कुटे पावसाने नुकसान झालेल्या पिकाची केली पाहणीसंग्रामपुर [ प्रतिनिधी] आक्टोंबर महिण्यात पावसाने धुमाकुळ घातल्याने व सतत सुरु असलेल्या पावसाने मुंग उळीद पिकांचे नुकसान झाले आता सोयाबीन ,ज्वारी ,कपाशी नुकसान झाले सतत सुरु असलेल्या पावसांने उरले सुरले पिक हि पाऊस हिराऊन घेतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अशी चिंता आ डॉ संजय कुटे यांनी पिक नुकसान पाहणी दरम्यान व्यकत केली त्यामुळे बळीराजा हवाल दिल झाला आहे शेतकरी बांधवांनो चिंता न करता हतबल न होता धिर धरा पिक नुकसान भरपाई सह विमा धारक शेतक-याना विम्याचा लाभ लवकरच मिळणार आहे आ डॉ कुटे यांनी महसुल विभागासह सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचारी सह तालुक्यातील खिरोडा, वरवट खंडेराव परिसरात शेतात जाऊन सोयाबीन , ज्वारी, कपाशी पिकांची पाहनी केली व संग्रामपुर तहसिल कार्यालयात महसुल उपविभागीय अधिकारी वैशाली दरेकर, तहसिलदार मुकुंदे, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी गवई , पं स कृ अधिकारी उंद्रे यांची आढावा बैठक घेऊन तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिक परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शेतकरीचे सर्व पिकांचे नुकसानीचे पंचनामे अहवाल त्वरित करुन शासनाला सादर करण्याचे आदेश महसुल विभागाला दिले पिक नुकसानीचे पंचनामे अहवाल २ दिवसात द्या जेणे करुन शासना करवी शेतकरीना नुकसान भरपाई त्वरित  देता येईल तसेच शेतकरी वंचीत राहुनये याची दक्षता घ्या तसेच कामचुकार करणाऱ्या कर्मचारीची हयगय केली जाणार नाही असा इशारा सदर आढावा बैठकीत आ डॉ संजय कुटे यांनी दिला यावेळी
जानराव देशमुख, गजानन दाणे, गणेश दातीर, सुभाष हागे,लोकेश राठी, कृष्णराव रहाटे,  रत्नप्रभा धर्माळ, भारत वाघ, ज्ञानदेव भारसाकळे, राजेन्द्र ठाकरे, गणेश गांधी, गोपाल मोहोकार , बंडडू पाटील ,सुधाकर शेजोळे, विठ्ठलराव पाटील, रामदास म्हसाळ, रमन सेवक,दिपक गोमासे, अविनाश धर्माळ, आत्माराम वरटकार, संतोष गाळकर, शिवा गाळकर ,विजय अढाव व महसुल विभागासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते

No comments:

Post a comment