तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणेने संवेदनशील असावे-फुलचंद भगतपिकविमा मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न होणार

शासन रब्बीसाठी बियाण्यांची उपलब्धता करणार

मंगरूळपीर-शेतकर्‍यांच्या मदतीसाठी यंञणेने संवेदनशिल असावे अशी विनंती करत खरीप आणी रब्बी हंगामातील पिकविमा भरणार्‍या शेतकर्‍यांची पावती विमा कंपनीकडे असतांना पुन्हा झेराॅक्स जोडन्याच्या प्रकीयेमुळे शेतकरी मेताकुटीस आल्याने ही पध्दत बंद करुन सरसकट पंचनामा करुन मदत जाहीर करन्यासाठी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.मुख्यमंञ्यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवत शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ देत असतांना पावतीचा आग्रह धरु नये असा प्रशासनाला आदेश दिल्याने नुकसानीच्या मदतीचा मार्ग सुकर झाला आहे.
          ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले पिक निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी शेतपिकांचे तीन दिवसांत (सहा नोव्हेंबर पर्यंत) पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावी. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत अशी विनंती सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे. पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषि विद्यापिठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा असे शासनाने निर्देश दिले आहेत. झालेले नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना पिक विमा आधार ठरणार आहे. पिक विम्याबाबत शेतकऱ्यांना एकत्रित सूचना देण्यात याव्यात. पीक विम्याचा लाभ देताना कंपन्यांनी विम्याच्या पावतीच आग्रह करू नये. पीक विम्याच्या मदतीसाठी करावे लागणारे अर्ज गावातच भरून घ्यावे. पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पोहोचू शकल्या नसल्यास शासकीय यंत्रणांनी केलेल्या पंचनामे त्यांनी ग्राह्य पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाचे कार्य करावे. नुकसानीचा फोटोही मदतीसाठी पुरावा ग्राह्य मानन्यात येणार आहे असेही मुख्यमंञ्यांनी सांगीतले आहे.
हाताशी आलेले संपूर्ण पीक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलासा देण्याचे काम करावे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीच्या समोर जावे लागू नये, याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. शेतपिकांच्या नुकसानीची व्याप्ती ही सार्वत्रिक आहे. आतापर्यंतची सर्वाधिक मदत राहणार आह. योग्य व्यक्तींना या मदतीचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करावे. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे मानून मिशन मोडमध्ये कार्य करावे असे स्पष्ट सुचनाही मुख्यमंञी महोदयांनी केल्याने नुकसानीच्या मदतीचा मार्ग आणखी सुकर झाल्याने शेतकर्‍यांचा शासनाप्रती विश्वास वाढला आहे.शासन सर्वतोपरी शेतकर्‍यांच्या पाठीशी ऊभे राहील्याने शासनाचे आभारही सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी मानले आहे.

No comments:

Post a comment