तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

करडा प्रकल्पाच्या भिंतीवरील वाढलेली झाडे लवकरात लवकर कापवित - प्रसाद देशमुखप्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 

करडा येथील धरणावरील भिंतीवर चोफेर मोठीमोठी झाडे वाढली आहेत .ह्या झाडांच्या मुळ्यामूळे प्रकल्पाच्या भिंतीला तडा जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.सध्या प्रकल्प तुडुंब भरला आहे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ शकते .
          या प्रकल्पावरील वृशांची तोड करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी केली आहे . शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून ह्या प्रकल्पाची उभारणी केली जाते जेणे करून परिसरातील नागरिकांना त्या प्रकल्पातील पाण्याचा लाभ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होईल .त्यामुळे या प्रकल्पाची सुरक्षितता ही जबाबदारी देखील तितकीच महत्वाची आहे . रिसोड तालुक्यातील करडा धरणाच्या निर्मितीला सुमारे 20 वर्ष्याच्या कालावधी लोटला आहे. त्यानंतर काही ठराविक वेळाच झाडे कापण्यात आली आहेत. पण सध्या खूप वर्षापासून झाडे कापण्यात आली नाहीत . धरणा शेजारील जमीन तसेच करडा गाव हे सुध्या नजीकच असल्यामुळे भीती नाकारता येत नाही. तरी संबंधीत विभागाने धरणाच्या भिंतीची पाहणी करून झाडे तोडण्याची मागणी प्रसाद देशमुख यांच्या कडून व समस्त गावकरी मंडळी च्या वतीने करण्यात आली आहे .भविष्यात कोणताही धोका होण्यापूर्वी दक्षता बाळगण्यासाठी तसेच शासनाने आर्थिक खर्च करून उभारलेल्या संरक्षक भिंतीची कार्यक्षमता वर्ष्यानुवर्षं कायम राखण्यासाठी लवकर लवकरच झाडे कापवित ही मागणी करण्यात आली आहे.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
9960292121
9420352121

No comments:

Post a comment